महसूल वाढीसह सर्वोत्तम सेवेचा ध्यास; पुणे टपाल क्षेत्राला महाराष्ट्र सर्कीलच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात तब्बल १८ पुरस्कार - टॉप न्यूज मराठी

महसूल वाढीसह उत्कृष्ट सेवेचा ध्यास घेत पुणे टपाल क्षेत्राने महाराष्ट्र सर्कीलच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात तब्बल १८ पुरस्कार पटकावले. वित्तीय वर्ष २०२५–२६ मध्ये विविध बचत व व्यवसायिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुणे क्षेत्राचा गौरव करण्यात आला.

पुणे टपाल क्षेत्राला उद्दिष्ट पूर्ती साठी प्रथम क्रमांक तर निव्वळ खाती संखेमध्ये द्वितीय क्रमाकाचे बक्षीस मिळाले.पुणे टपाल क्षेत्रात RD, TD, SCSS, सुकन्या समृद्धी तसेच इतर बचत योजनांअंतर्गत एकूण १२ लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली. 

पोस्टल जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा क्षेत्रात पुणे टपाल क्षेत्राला नवीन उत्पन्न वाढीसाठी राज्यस्तरावर द्वितीय तर एकूण वार्षिक उत्पन्न वाढीसाठी प्रथम क्रमांक मिळाला.

विभागनिहाय कामगिरीमध्ये पुणे शहर पश्चिम विभागाने बचत खाते उद्दिष्ट पूर्ती मध्ये राज्यस्तरावर द्वितीय क्रमाक, वार्षिक पोस्टल जीवन विमा प्रीमिअम वाढीमध्ये तृतीय क्रमांक,एकूण उत्पन्न वाढीसाठी तृतीय क्रमांक, आधार व्यवहार साठी तृतीय क्रमांक, पुणे ग्रामीण टपाल विभागाने ग्रामीण डाक जीवन विमा प्रीमिअम वाढीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला , पुणे शहर पूर्व विभागाने एकूण उत्पन्न वाढीसाठी पाचवा क्रमांक पटकावला. बारामती टपाल विभागाने पासपोर्ट सेवा केंद्रासाठी द्वितीय क्रमांक, आर.एम.एस पुणे बी डिविजन यांनीही पुरस्कार मिळवत या सोहळ्यात आपली छाप उमटवली. टपाल वितरण गुणवत्ते साठी पुणे शहर पश्चिम विभाग पार्सल विभागात प्रथम तर स्पीड पोस्ट मध्ये पुणे शहर पूर्व विभाग ग्रामीण टपाल कार्यालयातील गुणवत्तेसाठी प्रथम क्रमांक पटकावला

पोस्टमास्तर जनरल सौ. प्रीती अग्रवाल (आयपीओएस) व निदेशक डाक सेवा श्री अभिजित बनसोडे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत ही कामगिरी सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील शाखा पोस्ट कार्यालयांपासून शहरातील मोठ्या कार्यालयांपर्यंत कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने नागरिकांपर्यंत सर्व  योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करत राहणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.