पुणे शहर आज पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं हादरलं. बालाजीनगर परिसरातील अनेक नागरिक सकाळी कामासाठी बाहेर पडले होते. बस स्टॉप वर बसची वाट पाहणाऱ्यांची गर्दी होती. काही रिक्षा चालक प्रवाशांची वाट पाहत थांबले होते. तेवढ्यात सकाळी कामाला जाण्यासाठी बाहेर निघालेले नागरिक आणि तेवढ्यात दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी एकावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात रिक्षा चालक अक्षय उर्फ बाळू म्हस्के हा गंभीर जखमी झाला. काही वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सहाय्याने आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. त्यावेळी हे आरोपी पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं या तिसऱ्या खुनाचा कट रचला असा संशय आहे.
अक्षय म्हस्के हा आंबेगाव पठार परिसरात राहायला असून दिवसभर रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करतो. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र त्याचा भाऊ आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खुनातील मुख्य आरोपी आहे. तो सध्या तुरुंगात असल्यामुळे बदल्याच्या भावनेतून त्याच्या भावाला टारगेट केलं असण्याचा संशय व्यक्त केला जातो. यापूर्वीही आंदेकर टोळीनं बदल्याच्या भावनेतून दोन खून केले आहेत. पहिला खून स्वतःचाच आयुष्य कोमकर तर दुसरा खून आरोपी सॅम काळेचा भाऊ गणेश काळे याचा झाला होता. त्यानंतर आता हा तिसरा खुनाचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने अक्षय म्हस्के हा या हल्ल्यातून वाचला. त्यामुळे सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे. याविषयीची सविस्तर माहिती अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दिली.