पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तुम्हीही या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
कधी येणार हप्ता?: यापूर्वी २३ वा हप्ता जून महिन्यात येईल असा अंदाज होता. मात्र, आता हा हप्ता जूनच्या अखेरीस किंवा जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.
मागील हप्ता कधी मिळाला?: १३ मार्च २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुवाहाटी दौऱ्यादरम्यान २२ वा हप्ता देशातील ९.३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT द्वारे जमा करण्यात आला होता.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने अद्याप या हप्त्याबाबतची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना एकूण ६,००० रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी २,००० रुपये देते:
पहिला हप्ता: एप्रिल ते जुलै
दुसरा हप्ता: ऑगस्ट ते नोव्हेंबर
तिसरा हप्ता: डिसेंबर ते मार्च
बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने काही नियम कडक केले आहेत. खालील गोष्टी अपूर्ण असल्यास जुलै महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत:
१. ई-केवायसी : तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य आहे.
2.Land Verification): जमिनीची पडताळणी म्हणजेच land verification दरवेळी पूर्ण करणे आवश्यक आहे.
३. आधार-बँक लिंक: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
४. ॲग्रीस्टॅक नोंदणी: सरकारने आता 'ॲग्रीस्टॅक' पोर्टलवर नोंदणी करणे सुद्धा बंधनकारक केले आहे.
यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?
सर्वात आधी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
होमपेजवर 'शेतकरी कॉर्नर' हा पर्याय निवडा.
त्यानंतर 'लाभार्थ्यांची यादी' वर क्लिक करा.
तिथे तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका.
आता 'Get Data' वर क्लिक करा आणि 'पेमेंट स्टेटस' तपासा. तुमची संपूर्ण माहिती समोर येईल.
पुढील हप्त्याचा लाभ विनाअडथळा मिळवण्यासाठी केवायसी आणि बँक आधार लिंकिंगच्या कामात अजिबात हलगर्जीपणा करू नका. आजच आपले स्टेटस तपासा आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्या!