ओळख केली, गाडीत बसवलं अन् दोघांनीही केले अत्याचार; पुण्यातील कोरेगाव पार्कात वकील महिलेबरोबर भयंकर घडलं - टॉप न्यूज मराठी

पुण्यातील कोरेगाव पार्क मुंढवा परिसरातील रस्त्यावर मध्यरात्री भयंकर घटना घडली. आपल्या मित्रांसोबत जेवायला गेलेल्या एका महिलेवर धावत्या कार मध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले. 

ज्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर एका रेस्ट्रो बारमध्ये जेवण्यासाठी गेली होती. मित्र-मैत्रिणी गेल्यानंतरही ही महिला एकटी हॉटेलमध्ये बसून होती. 

त्यावेळी हॉटेलमध्ये असलेल्या दोघांनी तिच्याशी बोलून ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. मैत्री करण्याच्या बहाण्यानं तिला दुसऱ्या एका पब मध्ये पार्टीसाठी सोबत जाण्याचं आमिष दाखवलं. 

ही महिला या तरुणांच्या कार मध्ये बसून निघाल्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी महिलेने तात्काळ कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याविषयीची सविस्तर माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुणे शहरातील वाढत्या महिला अत्याचारांचा मुद्दा, रात्री उशिरापर्यंत चालणारे हॉटेल आणि पब याचबरोबर नशेच्या आहारी गेलेली तरुणाई असे अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. तर महिलांनी देखील अशा व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.