शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी कधी ? ‎ ‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकलं... ‎ - टॉप न्यूज मराठी

‎शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस मोठ्या घोषणांचा ठरला आहे. पंतप्रधान आवास योजनेतून आज राज्यातील ५ लाख कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरांच्या चाव्या सुपुर्त करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राला यंदा विक्रमी ३० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, त्यासाठी ९ हजार कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पुढच्या वर्षी आणखी १५ लाख घरांचे वाटप केले जाईल आणि येत्या पाच वर्षांत राज्यातील प्रत्येक बेघराला हक्काचे पक्के घर मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. घरांसोबतच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा केली असून, जून अखेरपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी होणार आहे. यात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असून, कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आजपासूनच १२.३५ रुपये दराने कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे.