पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेल कमी वापरून इंधनाची बचत करण्याचं आवाहन केलं. त्यानुसार अनेक आमदार, खासदार, मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत.
याच अनुषंगाने पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या ताफ्यातील गाड्या कमी करून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्यास सुरुवात केली आहे.
इतकंच नाही तर सुरक्षा व्यवस्थेत असलेली वाहनं कमी करून सुरक्षेसाठी केवळ एक वाहन सोबत ठेवलं आहे.