लाखो शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अडकले! ‎आता शासकीय योजनांचा लाभ थांबणार! ‎ - टॉप न्यूज मराठी

‎शेतकऱ्यांनो, तुम्ही नवीन ट्रॅक्टर, ठिबक सिंचन किंवा महाडीबीटीच्या योजनांसाठी अर्ज करताय? पण 'लॅण्ड रेकॉर्ड नॉट फाऊंड' असा मेसेज येतोय? सावधान! कारण आता 'फार्मर आयडी' शिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळणं कठीण होणार आहे.

‎

‎जसा आपला 'आधार कार्ड' असतो, तसाच आता शेतकऱ्यांसाठी एक अद्वितीय डिजिटल ओळख क्रमांक म्हणजेच 'फार्मर आयडी' तयार केला जातोय.या एकाच आयडीमध्ये तुमची जमीन, पीक पद्धती, बँक खाते, पीकविमा आणि पीएम-किसानची सर्व माहिती लिंक असेल. यामुळे कागदपत्रांचा ससेमिरा थांबेल आणि अनुदान थेट खात्यात जमा होईल.

‎

‎​

‎पण इथेच खरी अडचण निर्माण झाली आहे! ज्या शेतकऱ्यांनी २०२३ नंतर जमीन खरेदी केली आहे, ज्यांच्या नावे वारसा हक्काने फेरफार झाला आहे किंवा जमिनीचे विभाजन झाले आहे, अशा लाखो शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार होत नाहीत.

‎​ भूमिअभिलेख विभागाच्या नवीन नोंदी अजून 'अॅग्रिस्टॅक'  या केंद्र सरकारच्या डिजिटल प्रणालीशी जोडल्या गेलेल्या नाहीत.

‎

‎ऑनलाइन नोंदणी करताना 'डेटा मिसमॅच' किंवा 'व्हेरिफिकेशन पेंडिंग' असे मेसेज येत आहेत. यामुळे:

‎

‎​महाडीबीटी कृषी योजना.

‎​ठिबक आणि तुषार सिंचन अनुदान.

‎​आणि इतर पीक योजनांचा लाभ मिळण्यात अडथळा येत आहे.

‎शेतकरी सध्या सीएससी केंद्र आणि तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत, पण 'डेटा अपडेट झाल्यावर होईल' एवढंच उत्तर त्यांना मिळतंय.

‎​

‎आता गरज आहे ती महसूल आणि कृषी विभागाने तातडीने समन्वय साधण्याची.

‎१. २०२३ नंतरच्या फेरफार नोंदी अपडेट करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

‎२. आणि जोपर्यंत तांत्रिक अडचण सुटत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने योजनांचा लाभ घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.