दाक्षिणात्य सुपरस्टार विजय आणि त्रिशाच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय, पण यावेळी कारण ठरलीये गायिका सुचित्रा!"सुचित्राने थेट विजयच्या चारित्र्यावर बोट ठेवलंय. तिचं म्हणणं आहे की, घटस्फोट न घेता विजय त्रिशासोबत फिरून फॅन्ससमोर चुकीचं उदाहरण मांडतोय."इतकंच नाही, तर राजकारणात यशस्वी व्हायचं असेल, तर विजयला त्याचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांची साथ लागेल, असंही सुचित्राने सुचित केलंय. वडिलांशिवाय विजयचं राजकीय भविष्य धोक्यात असल्याचा दावा तिने केलाय.धक्कादायक म्हणजे, याच सुचित्राने काही महिन्यांपूर्वी दोघांचा बचाव केला होता. मग आता अचानक सुचित्राचा हा 'U-Turn' का? हाच प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.