वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असणारी नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती या प्रकरणाचा सीबीआय तपास करत आहे. पेपरफुटी प्रकरणी शुभम खैरनार याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. मात्र आता शुभम खैरनारच्या वडलांची प्रतिक्रिया समोर आली असून माझा मुलगा निर्दोष आहे गेल्या सहा महिन्यापासून तो नाशिकमध्ये बीएएमएसची प्रॅक्टिस करत असून या प्रकरणाशी त्याचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया पेशान वकील असणाऱ्या शुभम खैरनारचे वडील डॉ. मधुकर खैरनार यांनी दिली आहे.