दारू सोडवण्यासाठी मांत्रिकाकडे गेले अन् जीवाला मुकले; नाशिकच्या बागलाणमध्ये दोन तरुणांचा संशयास्पद मृत्यू - टॉप न्यूज मराठी

नाशिकच्या बागलाणमध्ये सध्या एका संशयास्पद घटनेने खळबळ उडाली आहे. दारूचं व्यसन सोडवण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झालाय नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया...

नाशिकचा बागलाण तालुका... तिळवण-कळवण रस्त्यावरील बारी परिसर. याच परिसरात एका दुचाकीसह दोन तरुणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. 43 वर्षांचे राजेंद्र लक्ष्मण सोनवणे आणि 39 वर्षांचे सचिन केशव जाधव असं मृत्यू झालेल्या तरुणाची नावं आहे. या दोघांना दारूचं व्यसन होतं. आणि हेच व्यसन सोडवण्यासाठी ते तालुक्यातील एका मांत्रिकाकडे गेले होते. आणि या ठिकाणाहून परत येत असतानाच या दोघांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान हा विषभादेचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जातोय या संबंधित घटनेची माहिती समजतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या दोघांचे मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांचा व्हीसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या अहवालानंतर मृत्यूचे नेमकं कारण करणार असल्याचं तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी सांगितलं आहे.