विकास लवांडेंना अटकपूर्व जामीन मंजूर; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप - टॉप न्यूज मराठी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात कोर्टाने त्यांना अटकपुर्व अंतरिम जामीन मंजूर केलाय. याविषयीची सुनावणी आज कोर्टात पार पडली.

पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्यात वारकरी संप्रदायाशी निगडित एका महिलेनं विकास लवांडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील अनेक महाराज आणि हिंदू धर्मातील काही अध्यात्मिक गुरू यांचा 

घुसखोर असा उल्लेख केला होता. त्यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या असून ही वक्तव्य बदनामीकारक आहेत, असं फिर्यादीत म्हणण्यात आलं होतं. याच प्रकरणी लवांडे यांनी वकील ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार यांच्या माध्यमातून अटकपूर्व अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. ज्यावर आज सुनावणी पार पडली. व कोर्टाने या अर्जाला मंजुरी दिली. त्याचबरोबर लवांडे यांनी संग्राम भंडारे आणि सहकाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या शाईफेक प्रकरणातील गुन्ह्यात जामीन पात्र कलमं लावल्याचा मुद्दाही कोर्टासमोर उपस्थित केला.