‎केस कापले, वेश बदलला तरीही नाशिक पोलिसांनी पकडलाच ‎ ‎नीट पेपर फुटीप्रकरणातील आरोपीला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या - टॉप न्यूज मराठी

‎नाशिक पोलिसांनी आज एका मोठ्या आंतरराज्य कारवाईत 'नीट'  परीक्षा घोटाळ्यातील संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत

 राजस्थान पोलिसांकडून आज सकाळी एक गुप्त माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. 

नीट प्रकरणातील एक मुख्य संशयित

 नाशिकमध्ये लपून बसल्याची खात्री पटताच, 

नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली.

‎विशेष म्हणजे, या आरोपीने पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी स्वतःचे केस कापले होते 

आणि आपली वेशभूषा पूर्णपणे बदलली होती. मात्र, नाशिक पोलिसांनी आपल्या तांत्रिक 

कौशल्याचा आणि खबऱ्यांच्या जाळ्याचा वापर करून या आरोपीचा अचूक माग काढला आणि

 त्याला शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांनी सांगितले की,

 पकडलेला आरोपी हा नीट परीक्षेतील गैरव्यवहाराशी संबंधित आहे. आता या आरोपीचा ताबा घेण्यासाठी 

केंद्रीय तपास पथक लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार असून, त्यानंतरच त्याला त्यांच्या स्वाधीन केले जाईल.

 या कारवाईमुळे परीक्षा घोटाळ्यातील मोठी साखळी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

‎