खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला महामार्गावर अपघात - टॉप न्यूज मराठी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला.

 एका बेदरकार वाहनचालकाने त्यांच्या गाडीला बाजूने धडक दिली. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने सुप्रिया सुळे यांच्यासह गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार सुप्रिया सुळे आज कामानिमित्त पुणे येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होत्या. 

महामार्गावर प्रवास सुरू असताना, GJ13CF5257 या क्रमांकाच्या एका वाहनाने सुळे यांच्या गाडीला पाठीमागून 

आणि बाजूने जोरदार धडक दिली. संबंधित वाहनचालक अत्यंत बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचे  सांगितले. या धडकेमुळे सुळे यांच्या वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

"सर्वजण सुरक्षित आहोत" – सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

अपघातानंतर सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडिया आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे आपली प्रकृती ठीक असल्याचे सांगितले

. त्यांनी नमूद केले की, "पुणे ते मुंबई प्रवास करत असताना एका वाहनाने आमच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने, मी आणि माझ्यासोबत असलेले सर्व सहकारी सुरक्षित आहोत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. केवळ दैवाच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मोठी दुर्घटना टळली आहे."