पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेम संबंधातून थरारक हत्याकांड घडलं आहे. पाच महिन्यांपूर्वी ज्या तरुणानं नकार देणाऱ्या तरुणीवर जीवघेणा हल्ला केला होता,
त्याच तरुणाची आता चाकू आणि चॉपरने हत्या करण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काळेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना अटक केली आहे.
सुभान शेख असं हत्या झालेल्या 19 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याचं एका मुलीवर प्रेम होतं.
मात्र ती नकार देत असल्यामुळे त्याने तिच्यावर पाच महिन्यांपूर्वी हल्ला केला. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता.
पाच दिवसांपूर्वीच तो जामीनावर बाहेर आला. मात्र पुन्हा तो आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करेन अशी भीती मुलीच्या आईला वाटत होती.
त्याबद्दल मुलीच्या आईने विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी यांना माहिती दिली. त्यांनी या तरुणाला 'पोरीचा नाद सोड नाहीतर परिणाम वाईट होतील'
असा दम दिला. मात्र त्यानंतर त्यांनी थेट या तरुणाची भर चौकात हत्या केली.