पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील काळभोरनगर परिसरात एका लहान मुलाची चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा या महिलेच्या बॅगेची झडती घेण्यात आली, तेव्हा त्यात धारदार चाकू, गुंगीचे औषध आणि एक स्प्रे आढळून आला आहे. ही महिला मूळची कुठली आहे? ती केवळ एकटीच हे काम करत होती की तिच्यामागे एखादी मोठी आंतरराज्य टोळी कार्यरत आहे? तिने यापूर्वी अशा काही घटना केल्या आहेत का? या सर्व प्रश्नांचा तपास सध्या पिंपरी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.