विवेक वाडेकर पुणे आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त - टॉप न्यूज मराठी

विवेक वाडेकर (आयआरएस १९९१ ची तुकडी) यांनी पुणे येथील आयकर विभागाचे 'प्रधान मुख्य आयुक्त' म्हणून पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी  वाडेकर हे पुणे येथे 'मुख्य आयकर आयुक्त' म्हणून काम पाहत होते. 

वाडेकर यांनी तीन दशकांहून अधिक सेवाकाळात करप्रणाली, आर्थिक अंमलबजावणी, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक बाबी हाताळताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. याशिवाय, 

आर्थिक गुन्हे आणि बेकायदेशीर पैशांचे व्यवहार संदर्भातील दिल्ली येथील 'सक्तवसुली संचालनालय' मध्ये विशेष संचालक आणि 'आर्थिक गुप्तचर' विभागात अतिरिक्त संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.  

तसेच , त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयात आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयात उपसचिव, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात संचालक, आयकर विभागाच्या 'दक्षता संचालनालय' मध्ये अतिरिक्त सहसंचालक, 

तर दिल्ली येथील मुख्य आयकर आयुक्त आणि प्रधान आयकर आयुक्त म्हणूनही सेवा बजावली आहे. 

विवेक वाडेकर यांच्या विविध पदांवरील नियुक्त्यांमुळे त्यांची कारकीर्द एका सामान्य महसूल अधिकाऱ्यांच्या पारंपरिक कामाच्या कक्षेपलीकडे विस्तारली आहे.  

वाडेकर यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले. इतिहासातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, त्यांनी पुणे विद्यापीठातून जर्मन भाषेचा पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.