मनुवादी व सनातन वैदिक विचारांची संतांच्या वारकरी संप्रदायात झालेल्या घुसखोरीचा निषेध;पुण्यात वारकरी परिषद संपन्न - टॉप न्यूज मराठी

पुणे दि. 2/5/2026 विचारांची संत विचार वारकरी परिषदेचे पुण्यातील एस एम जोशी फाउंडेशन येथे आज आयोजन करण्यात आले होते. सदर परिषद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन हभप भारत महाराज घोगरे यांनी केले. अध्यक्षीय भाषण भाषण संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी उल्हास दादा पवार यांनी केले. यावेळी जेष्ठ अभ्यासक वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त दिनकर शास्त्री भुकेले, ह भ प ज्ञानेश्वर महाराज वाबळे,ह भ प श्यामसुंदर सोन्नर महाराज, ह भ प मोहनानंद महाराज पूर्ंदावडेकर यांनी परखड मनोगत मांडून मार्गदर्शन केले.

उपस्थितांमध्ये भागवत वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये दत्ता महाराज दोन्हे, समाधान महाराज देशमुख, सचिन महाराज पवार, देवराम कोठारे, रवींद्र माळवदकर, अँड.भगवानराव साळुंखे, प्रा.सुभाष वारे इत्यादी 200 पेक्षा जास्त वारकरी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील वैचारिक घुसखोरी बद्दल परखड भाष्य सर्व मान्यवर वक्त्यांनी केले. संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनातून काही जण धर्मांध ,मनुवादी , वर्णवर्चस्ववादी,हिंसक आणि विद्वेषी विचारांची मांडणी  करतात तसेच अनेक चुकीच्या प्रथा परंपरा ,धंदेवाईकपणा सुरू झाला याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली.

 संतांचे विचार आणि भारताचे संविधान हे वैचारिक दृष्ट्या एकमेकांना सुसंगत आणि पूरक आहे याचे अनेक दाखले देण्यात आले.

 संतांचा समतावादी व मानवतावादी सहिष्णुतावादी विचार टिकला पाहिजे. अशी सप्रमाण मांडणी सर्वांनी केली.

 महाराष्ट्रातील संतांनी उत्तरेपर्यंत वारकरी संप्रदायाचा विचार पोहोचवला मात्र गेल्या काही वर्षात उत्तर भारतातील मनुवादी विचाराचे धंदेवाईक लोक महाराष्ट्राच्या संत विचारांवर अतिक्रमण करत आहेत याचा निषेध व्यक्त करण्यात आला. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.