शिवसेनेचे विधानपरिषद उमेदवार ठरले! नीलम गोऱ्हे, बच्चू कडू यांना उमेदवारी - टॉप न्यूज मराठी

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने अखेर आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि 'बच्चू कडू यांना पक्षाने मैदानात उतरवले आहे. 

या दोन नावांच्या निवडीमुळे शिवसेनेने एकाच वेळी 'अनुभव' आणि 'आक्रमकता' असा दुहेरी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत शिवसेनेत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर पक्षाच्या कोअर कमिटीच्या चर्चेनंतर नीलम गोऱ्हे यांच्या नावावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवण्यात आला. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आणि महिला प्रश्नांवरील पकड यामुळे गोऱ्हे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र दुसऱ्या जागेवर अनेक चेहरे इच्छुक असताना अचानक बच्चू कडू यांचं नाव चर्चेत आलं होतं अखेर बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे