विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भारतीय जनता पक्षाकडून पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती या सोबतच पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा राजीव सातव यांना भाजपने उमेदवारी दिली होती.
त्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना स्वतः उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेत जावं यासाठी महाविकास आघाडीतील नेते आग्रही होते.
मात्र उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत आपल्या विश्वासू चेहऱ्याला विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.
कुणाला मिळाली उमेदवारी?
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आले असून याबाबतची अधिकृत घोषणा माजी पर्यावरण मंत्री ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.