बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीमध्ये 84 टक्के मतदान झाले असून आज सकाळी दहा वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते.
रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला असून संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. अश्विनी देशमुख यांचा पराभव करत 92 मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत