नाशिकच्या विकृत अशोक खरातची अजबा प्रकरण पाहून महाराष्ट्र हादरलेला असताना आता याच नाशिक मधून
आणखी एक भोंदू बाबा समोर आलाय. याबाबत देखील महिलेच्या धार्मिक विधीच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या महिलेचे अश्लील फोटो व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केलं असं सुद्धा उघडकीस आलंय. या नराधम बाबाचं नाव महेश गिरी उर्फ महेश काकडे असं आहे.
निफाड तालुक्यातील प्रति गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारणगाव खडक येथील मठात महेश गिरी हा बाबा असतो.
स्वतःचं वैवाहिक आयुष्य आणि अडचणींमुळे त्रस्त असलेली एक तरुणी माहेरी आपल्या आई-वडिलांबरोबर राहत होती.
त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला या बाबाकडे न्यायचं ठरवलं. बाबाला भेटल्यावर त्याने या तरुणीला भूतबाधा झाली असल्याचे सांगत काही विधी करायला सांगितले.
त्यासाठी दर गुरुवारी मंदिरात येऊन पूजा करायला सांगितली. या सगळ्याच्या दरम्यान बाबाने या तरुणीशी ओळख वाढवली. दरम्यान एकदा त्याने तिला एकदा एकांतात भेटायला बोलावलं.
तिथून तिला लॉजवर नेऊन जबरदस्ती केली. तरुणीने नकार देताच बाबांनी गळ्यातील रुद्राक्ष दाखवत माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू माझ्या तावडीतून सुटू शकत नाहीस,
असं म्हणत तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर या तरुणीचे अश्लील फोटो व्हिडिओ काढण्यात आले.
तरुणीने हा प्रकार आई वडील आणि आपल्या पतीलाही सांगितला मात्र गुन्हा दाखल करण्याची त्यांची तयारी नव्हती.
मात्र या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेत तरुणीला धीर दिला. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या प्रकरणामुळे नाशिकमध्ये पुन्हा खळबळ उडाली असून खरात प्रकरणाप्रमाणेच इथेही पिडीतांची संख्या जास्त असू शकते.
त्यामुळेच न घाबरता समोर येऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पीडित तरुणीच्या वतीने करण्यात आलंय.