Heavy Rain

राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पाऊसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

341 0

पुणे : राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे पुढचे काही दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Department) वर्तवण्यात आली आहे.

‘या’ 7 जिल्ह्यांना गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यामध्ये परभणी लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये गारपीट (hailstorm) आणि मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे हवामान खात्याने या ठिकाणी ऑरेंट अलर्ट (Orient Alert) जारी केला आहे. तसेच या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं संरक्षण करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी उन्हाळयात पावसाळ्यासारखी परिस्तिथी निर्माण झाली आहे.

Share This News

Related Post

Sambhaji Bhide And Bujbal

Sambhaji Bhide : भिडेंवर कठोर कारवाई का होत नाही? भुजबळांनी केले स्पष्ट

Posted by - July 30, 2023 0
नाशिक : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वाद…
Pune University

पुणे, मुंबई अन् कोकण कृषी विद्यापीठाला मिळाले नवीन कुलगुरु; जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Posted by - June 6, 2023 0
मुंबई : अखेर आज मुंबई विद्यापीठ (Mumbai University), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University) आणि कोकण कृषी विद्यापीठासाठी (Konkan Agricultural…
Accident

Accident : देवदर्शनाहून परत येताना काळाचा घाला; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Posted by - June 25, 2023 0
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताचे (Accident) सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा या महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे.…
Aalandi News

पोलीस-वारकऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीप्रकरणी पोलीस आयुक्तांनी केला ‘हा’ मोठा दावा

Posted by - June 12, 2023 0
पुणे : मागच्या वर्षीच्या ‘पालखी प्रस्थान सोहळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत काही महिला जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी…
Maharashtra Rain

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Posted by - February 26, 2024 0
मुंबई : देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल (Weather Update) जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वी उन्हाचा तडाखा जाणवत असताना उत्तर भारतात हवामानाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *