मंत्रिमंडळ बैठक : बाजार समितीच्या निवडणूकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

165 0

मुंबई : राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

ज्यांच्याकडे दहा आर इतकी जमीन असेल अशा 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदान करता येईल.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यामुळे 7/12 धारक खातेधारक शेतकरी हाच निकष ठेऊन प्रचलित अधिनियमात सुधारणा करुन खालीलप्रमाणे फायदे होणार आहेत . बाजार समितीचे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि बहुउददेशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदार संघ हे मर्यादीत स्वरूपाचे मतदार संघ संपुष्टात येतील.

सध्या ग्रामपंचायत मतदार संघामधून ब-याच ठिकाणी शेती नसणारे ग्रामपंचायत सदस्य मतदान करतात. जे शेतक-यांचे प्रतिनिधीत्व करत नाही म्हणून शेतकरी खातेदारामधून निवडणूक झाल्यास शेतकरी प्रतिनिधीची निवड प्रत्यक्ष शेतक-यामधून होईल.

Share This News

Related Post

राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 5, 2023 0
सातारा: पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक…

महसूलमंत्र्यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ; ‘या’ तारखेपासून पुन्हा सुरु होणार शेतकरी लाँग मार्च

Posted by - April 22, 2023 0
राज्यातील शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. आपल्या विविध मागण्यासांठी शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील…

आदित्य ठाकरे आज नाशिक आणि पुणे दौऱ्यावर; अतिवृष्टीग्रस्त भागांना देणार भेट

Posted by - October 27, 2022 0
पुणे : परतीच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद…

शेतकऱ्यांना दिलासा : अतिवृष्टीमुळे पिंकाच्या नुकसानीसाठी 3 कोटी 18 लाख रुपयांचे निविष्ठा अनुदान वितरीत

Posted by - October 18, 2022 0
पुणे : अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान जिल्ह्यातील ९ हजार १९२ शेतकऱ्यांच्या २ हजार २४७ हे. ८५ आर क्षेत्रावरील…

“मी शेतकऱ्यांची माफी मागतो, येथे दहा दिवसात या प्रश्नावर तोडगा निघेल…!” कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांची मागितली माफी

Posted by - March 11, 2023 0
रासायनिक खते खरेदी करत असताना इ पॉस मशीनमध्ये शेतकऱ्यांना आपली जात लिहावी लागत आहे. जात न लिहिता ते मशीन पुढची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *