पुणे येथे १३ ते १५ मार्च या कालावधीत तांदूळ महोत्सव ; अधिकाधिक नागरीकांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

359 0

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेला उच्च दर्जाचा अस्सल इंद्रायणी, आंबेमोहर व स्थानिक वाणांचा तांदुळ, नाचणी, कडधान्ये आदी शेतमाल शेतकऱ्यांकडून थेट शहरातील नागरिकांना रास्त दरात उपलब्ध व्हावा आणि शेतकरीगटांना शेतमालाच्या विक्रीतून योग्य आर्थिक मोबदला मिळावा यासाठी १३ ते १५ मार्च या कालावधीत कृषी विभाग व ‘कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा’ (आत्मा) यांच्यावतीने तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १३ मार्च रोजी शिवाजीनगर येथील कृषी भवन इमारतीजवळ या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विश्वजीत कदम यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

कृषी भवन इमारतीच्या पाठीमागे, साखर संकुल शेजारी, के. बी. जोशी पथ, नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर, पुणे येथे सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत महोत्सव असणार आहे. तांदूळ महोत्सवास ग्राहकांनी भेट देऊन रास्त दरातील खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

नदी सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता- सारंग यादवाडकर

Posted by - March 19, 2022 0
नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आता राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना नो एन्ट्री! राजू शेट्टी यांनी घेतला निर्णय

Posted by - October 3, 2023 0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज संघटनात्मक दृष्ट्या मोठा निर्णय घेतला आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यापुढे स्वाभिमानी…
Pune News

Pune News : पतीच्या ‘त्या’ त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - May 9, 2024 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पतीकडून सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने टोकाचे…

‘…. मग हिंदू उत्सवातल्या स्पीकरचे काय करणार ?’, राज ठाकरे यांच्या भूमिकेला हिंदू संघटनांचा विरोध

Posted by - May 2, 2022 0
पुणे- लाउडस्पीकर खाली आलेच पाहिजेत, पण मग हिंदू उत्सवातल्या स्पीकरचे काय करणार ? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे…

पुणे : दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त देवेंद्र पोटफोडे यांची पुणे अग्निशमन प्रमुख पदी नियुक्ती

Posted by - August 29, 2022 0
पुणे : राज्य सरकारने, दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले श्री देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *