प्रधानमंत्री कुसुम योजना : शेतकऱ्यांना 90 ते 95 % अनुदानावर सौरपंप ; लाभार्थी निवडीचे निकष , लाभाचे स्वरुप , अर्ज करण्याची पद्धत , वाचा सविस्तर

213 0

महाकृषी ऊर्जा अभियान- प्रधानमंत्री कुसुम योजना सौर पंप आणि इतर अक्षय ऊर्जा सयंत्रांच्या स्थापनेसाठी सुरु केली आहे. कृषी क्षेत्राला डिझेलमुक्त करण्यासाठी ही योजना असून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियानात त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना कुसुम योजनेच्या घटक-ब अंतर्गत ९० ते ९५ टक्के अनुदानावर सौरपंप मिळतात.

See the source image

लाभार्थी निवडीचे निकष:
• शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
• पारंपरिक वीज जोडणी नसणारे शेतकरी
• अटल सौर कृषी पंप योजना टप्पा १ व २ किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार शेतकरी.
• ५ एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती, ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती, ५ एकर क्षेत्रापेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास भौगोलिक परिस्थितीनुसार मागणी विचारात घेऊन ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय.

लाभाचे स्वरुप
• सर्वसामान्य शेतकऱ्याचा दहा टक्के लाभार्थी स्वहिस्सा, उर्वरित ९० टक्के अनुदान.
• अनुसूचित जाती,जमातीच्या शेतकऱ्याचा पाच टक्के लाभार्थी स्वहिस्सा, उर्वरित ९५ टक्के अनुदान.

अर्ज करण्याची पद्धत
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळ लिंकवर ऑनलाईन पद्धतीने

अधिक वाचा : अर्थकारण : Credit Score खराब झालाय ? सुधारण्यासाठी करा हे …

Share This News

Related Post

रशिया VS युक्रेन : रशियाने घातक व्हॅक्यूम बॉम्ब युक्रेनवर टाकला ? व्हॅक्यूम बॉम्ब किती घातक आहे जाणून घ्या

Posted by - March 1, 2022 0
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचत चालला आहे. रशियाकडून व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला करण्यात आल्याचा दावा युक्रनेकडून करण्यात येत…

अधिवेशनात रवी राणा यांचा आक्रमक पवित्रा, “मला बोलूद्या नाही तर मी फाशी घेईन”

Posted by - March 7, 2022 0
शाई फेक प्रकरणात राणा यांना अटक होणार होती मात्र न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. यानंतर आयुक्त…

पितांबरीचा वापर न करता घरातल्या तांब्या पितळाची भांडी चमकतील अगदी नव्यासारखी

Posted by - October 17, 2022 0
सण-वार जवळ आले की आणखीन एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे देवाची तांब्या पितळेची भांडी साफ करणे. तांब आणि पितळेचे…
Shri Guruji Talim Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! श्री गुरुजी तालीम गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *