शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

222 0

केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा 2 टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने सर्वसामान्य शेतकरी आणि जिल्हा सहकारी बँका यांना दिलासा द्यावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. व्याज परतावा बंद करण्याच्या केंद्राच्या अलीकडील निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्र दिले असून हा परतावा पूर्ववत सुरु ठेवण्याची मागणीही केलेली आहे. व्याज परतावा बंद झाल्याने राज्यातील 70 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

आज सहयाद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत देखील हा व्याज परतावा परत सुरू करण्याबाबत ठराव करण्यात आला.

केंद्र शासनाने 28 मार्च, 2022 रोजीच्या परिपत्रकाद्वारे अल्प मुदतीच्या पीक कर्ज वाटपात बँकांना दिला जाणारा 2 टक्के व्याज परतावा बंद करण्याचे आणि चालू आर्थिक वर्षापासून हा लाभ देता येणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे चालू वर्षात पीक कर्ज वाटपात बँकांना केंद्र शासनाचा 2 टक्के व्याज परतावा मिळणार नाही आणि जिल्हा सहकारी बँका आर्थिक अडचणीत येवून त्याचा प्रतिकूल परिणाम पीक कर्ज वाटपावर होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात.

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची सध्या चालू असलेली योजना शुन्य टक्के दराने कशी राबवायची हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, मूळातच ही व्याज परतावा योजना सुरु करण्यात जिल्हा सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पीक कर्ज देणे हा उद्देश होता. मोठ्या प्रमाणावर कर्जासाठी शेतकरी हे ह्या बँकांवर अवलंबून असतात. बँकांना 7 टक्केपेक्षा अधिक दराने कर्ज वाटप करता येत नसल्याचे केंद्र शासनाच्या परिपत्रकात नमूद आहे. तथापि, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा निधी उभारणीचा खर्च व्यापारी बँकांच्या तुलनेत जास्त असल्याने केंद्र शासनाचे 2 टक्के व्याज अनुदान बंद झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकांना आर्थिक नुकसान सोसावे लागेल.

यापूर्वीच्या केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे बँकांनी 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज 7 टक्के दराने शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्यास बँकांना 2 टक्के व्याज परतावा देय होता. या बाबत राज्य शासनाने बँकांनी शेतकऱ्यांना 7 ऐवजी 6 टक्के व्याजदराने पीक कर्ज वाटप करावे व त्यासाठी राज्य शासन 1 टक्का व्याज परतावा बँकांना अदा करेल असा निर्णय घेतला होता. याप्रमाणे बँकांना पीक कर्ज वाटपासाठी केंद्र शासनाकडून 2 टक्के दराने व राज्य शासनाकडून जिल्हा बँकांना 2.5 टक्के दराने व व्यापारी बँकांना 1 टक्के दराने व्याज परतावा मिळून शेतकऱ्यांना 6 टक्के व्याज दराने 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज उपलब्ध होत होते. सदरच्या कर्जाची नियमित परतफेड केल्यास वर नमूद केल्याप्रमाणे शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध होते.

केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे बँकांना 2 टक्के दराचा व्याज परतावा मिळणार नसल्याने बँकांना व्याजाचे नुकसान होणार असून त्याचा बोजा शेतकऱ्यावर पडणार आहे. पिकांच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या निविष्ठांच्या किंमती सातत्याने वाढत असून पिकांचा उत्पादन खर्च वाढत आहे. या सर्व बाबींचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक हित विचारात घेवून पीक कर्जासाठी बँकांना देण्यात येणारी 2 टक्के व्याज परतावा योजना पूर्ववत सुरु ठेवावी असे मुख्यमंत्र्यांनी आग्रही प्रतिपादन केले आहे.

Share This News

Related Post

narayan rane

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 7, 2024 0
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या…
TUSHAR HAMBIRARO

PUNE POLICE : तुषार हंबीरराव हल्ला प्रकरणातील ‘ते’ तीन पोलीस शिपाई निलंबित

Posted by - September 20, 2022 0
पुणे : खून या सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तुषार हंबीर हा येरवडा कारागृहामध्ये होता. त्याच्यावर वैद्यकीय उपचारासाठी त्याला 28 ऑगस्ट…
Crime

धक्कादायक! अनैतिक संबंधातून महिलेसह दोन मुलांना दिरानं जिवंत जाळलं

Posted by - April 6, 2023 0
विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून अनैतिक संबंधातून महिलेसह दोन मुलांना दिरानं जिवंत जाळल्याची…

Breaking News ठरले ! एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरले ? हे असणार बंडखोर आमदारांच्या गटाचे नाव ?

Posted by - June 25, 2022 0
गुवाहाटी- एकनाथ शिंदे यांच्या बंदमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची टांगती तलवार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक…

#MUMBAI : मालाड पूर्वमध्ये झोपडपट्टीला भीषण आग; 50 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक;एका व्यक्तीचा मृत्यू, आगीची भीषणता दाखवणारा व्हिडिओ व्हायरल

Posted by - February 13, 2023 0
मुंबई : मुंबईतील मालाड पूर्वच्या जामरुशीनगर परिसरात असलेल्या झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये आत्तापर्यंत 50 हून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *