Monsoon Update

Monsoon Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात 48 तासांत मान्सून होणार दाखल

609 0

पुणे : जून महिना संपत आला तरी अजून राज्यात मान्सून (Monsoon Update) दाखल न झाल्याने नागरिक, शेतकरी हैराण झाले आहेत. मात्र आता हवामान विभागाकडून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच पुढील 48 तासांत मान्सूनच्या (Monsoon Update) सरी कोसळण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे ही मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मान्सून येत्या 48 तासांत मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Marijuana : अबब…. पुण्यात सापडला 36 किलो गांजा; महाविद्यालयीन तरुणाला अटक

कोणत्या जिल्ह्यात कोसळणार पाऊस ?
पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात या मान्सूनच्या सारी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भात 23 जूननंतर पावसाला सुरु होण्याची शक्यता आहे.

Video : काळी जादू केल्याच्या संशयावरून जोडप्याला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण

शेतकऱ्यांना मिळेल दिलासा
पावसाचं पुनरागमन (Monsoon Update) झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मात्र पावसाचे पूर्वानुमान पाहून पेरणीचे नियोजन करावे असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. पावसाअभावी कोवळी पिके करपून जाण्याची भीती व्यक्त होत असतानाच खोळंबलेल्या पेरण्या अन् दुबार पेरणीच्या धास्तीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या महीना झाला तरी पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Share This News

Related Post

Arun Sinha Pass Away

Arun Sinha Pass Away : पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन

Posted by - September 6, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे व स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे (Arun…

ACB TRAP : 3 लाखाच्या लाचेची मागणी; 2 लाखाचे सेटलमेंट; पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Posted by - December 30, 2022 0
पिंपरी : पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस (वय वर्षे 3१) तीन लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत.…

“कंडोमच्या जाहिरातीमध्ये गरबा खेळताना दाखवणे भावना दुखवणे नाही, जाहिरातीचा उद्देश केवळ…!” हायकोर्ट निकाल देताना काय म्हणाले वाचा

Posted by - December 29, 2022 0
मध्य प्रदेश :”कंडोमच्या जाहिरातीमध्ये गरबा खेळताना दाखवणे म्हणजे भावना दुखणे नाही…!” असा स्पष्ट निकाल मध्यप्रदेश हायकोर्टाने दिला आहे. मध्यप्रदेश हायकोर्टाचे…

मोठी बातमी : पंढरपूरला निघालेल्या 12 वारकऱ्यांना कारची जोरदार धडक; भीषण अपघातात 6 वारकरी जागीच ठार

Posted by - October 31, 2022 0
पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळानं घाला घातला आहे दिंडीमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात सहा वारकऱ्यांनी आपला जीव…

#MAHARASHTRA POLITICS : “… म्हणून अजित दादा पवार यांना मुख्यमंत्री करता आले नाही ! ” शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Posted by - February 11, 2023 0
नाशिक : अजित पवार यांना मुख्यमंत्री पद का दिले नाही यावरून टीकाटिप्पणी होत असताना शरद पवार यांनी थेट उत्तर देऊन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *