पणन संचालकांच्या हस्ते ॲमेझॉनच्या भाजीपाला संकलन केंद्राचे उदघाट्न

160 0

पुणे : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथे राज्यातील पाचव्या ॲमेझॉन फळ व भाजीपाला संकलन केंद्राचे राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार यांच्या उद्घाटन हस्ते झाले.

पणन संचालक श्री. पवार म्हणाले, शेतकऱ्याना भाजीपाला, पालेभाज्या व इतर फळांचे संकलन आणि वितरणाच्यादृष्टीने अॅमेझॉन संकलन केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहे. या संकलन केंद्रांमुळे दलालीला आळा बसून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कंपन्या आज उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाच्या बाबतीत फायदा होईल, अशी आशा श्री. पवार यांनी व्यक्त केली.

ग्राहक ते थेट बाजारपेठ व्यवस्था केवळ आपल्या राज्यात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्यादृष्टीने पणन मंडळाच्यावतीने कंत्राटीशेती आणि तत्सम पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

राजेश प्रसाद म्हणाले, ॲमेझॉनने महाराष्ट्रात पहिले संकलन केंद्र मंचर येथे सुरु केले. त्यानंतर नाशिक, वाई, रत्नागिरी आणि आता पुणे येथील हे पाचवे केंद्र आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा मोबदला ॲमेझॉनच्यावतीने पाच तासांच्या आत देण्यात येतो. शेतकऱ्यांना पीक लागवड तसेच रोग व कीड नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते, असेही ते म्हणाले.

संकलन केंद्रामुळे स्थानिक भाजीपाला शेतकऱ्यांना ॲमेझॉन खरेदी प्लॅटफॉर्मवर आणले असून त्यांचा बाजारपेठेतील प्रवेश वाढणार असल्याचे, डॉ. शशीन म्हणाले.

Share This News

Related Post

SBI

SBI चा ग्राहकांना मोठा झटका! डेबिट कार्ड संदर्भातील ‘हा’ नियम 1 एप्रिलपासून होणार लागू

Posted by - March 28, 2024 0
भारतीय स्टेट बँकेने (SBI) ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेकडून डेबिट कार्डसंबंधी काही नियमांत बदल करण्यात आले असून हे बदल…

अर्थकारण : खासगी नोकरीत पेन्शनची सुविधा नाही… ? स्मार्ट पद्धतीने गुंंतवणूक करून पेन्शनसारखी सुविधा मिळावा

Posted by - July 28, 2022 0
अर्थकारण : एखाद्या सरकारी खात्यात किंवा खासगी क्षेत्रातील कंपन्यांत कर्मचार्‍यांना पेन्शनची सुविधा नसेल किंवा एखाद्या कर्मचार्‍याने पेन्शन योजनेत गुंतवणूक केलेली…

अर्थकारण : वापरात नसलेले बँक खाते पुन्हा चालू करायचं आहे ?

Posted by - October 21, 2022 0
दीर्घकाळ एखाद्या बँक खात्यातून व्यवहार झाले नाहीत तर ते खाते इनऑफरेटीव्ह म्हणजे वापरात नसलेले खाते म्हणून ओळखले जाते. सलग दोन…

अकाउंट मधून पैसे कट झाले,परंतु ATM मधून कॅश मिळालीच नाही?वाचा हि महत्वाची माहिती…

Posted by - July 9, 2022 0
एटीएममुळे पैसे काढणे सोयीचे झाले असले तरी तांत्रिक चुकांचा फटका आपल्याला काही वेळा सहन करावा लागतो. अशावेळी एटीएममध्ये सजग राहणे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *