राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

864 0

सातारा: पर्यावरणाच्या समतोलासाठी व शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळावे म्हणून राज्य शासनाने बांबू लागवडीची योजना सुरू केली आहे. बांबू पासून अनेक उत्पादने घेता येतात यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. तरी राज्यातील शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त बांबू लागवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दरे तालुका महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते बांबू लागवड करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी या राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

बांबू हे शेतकऱ्यांसाठी बहुद्देशीय उपयोगी पीक असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना बांबू लागवड माध्यमातून जोड धंदा मिळवा म्हणून शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ऊस लागवडीमधून साधारणतः हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रति टन किमान 2500 मिळतो. तर बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन 100 टन व भाव प्रति टन किमान 4000 मिळतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत. तिसऱ्या वर्षापासून बांबूचे उत्पादन सुरू होते. जमिनीची धूप व जलसंवर्धन होते.

कृषि अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी बांबू पासून इथेनॉल निर्मिती केली जाते. 1 हेक्टर ऊस लावला तर 2 कोटी लिटर पाणी लागते व 1 टन ऊस गाळला तर 80 लीटर इॅथेनॉल निघते. आणि 1 हेक्टर बांबू लावले तर 20 लाख लीटर पाणी लागते. 1 टन बांबू गाळला तर 400 लीटर इथेनॉल निघते. तसेच प्रति एकरी 40 टन उत्पादन मिळते. बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सिजन हवेत सोडत असतो. एक एकर क्षेत्रामधून सर्वसाधारण 60 टन ऑक्सिजन तयार होतो. त्याचप्रमाणे एक हेक्टर क्षेत्रामधून सर्वसाधारणपणे 200 टन इतका र्काबन डायऑक्साईड हवेतून बांबूव्दारे शोषला जातो. त्यामुळे बांबू लागवड केल्यास तापमान कमी करण्यासाठी मदत होणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Share This News

Related Post

Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी

Posted by - November 10, 2023 0
पुणे : कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम…

चिनी लोन ॲप वरून लोन घेताय सावधान! ही माहिती ठरेल तुमच्यासाठी उपयुक्त

Posted by - September 18, 2022 0
चिनी लोन ॲप्सवरून कर्ज घेतल्यानंतर त्याच्या जाळ्यात अडकल्याची शेकडो प्रकरणं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. काहींनी तर कर्जाचे हप्ते…

राज्यातील 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनं बदल्या

Posted by - April 25, 2023 0
राज्यातील 11 IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीतील पदावर…
Congress

Congress Loksabha : काँग्रेसची लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Posted by - March 8, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आता काँग्रेसने आपली यादी जाहीर केली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *