आदित्य ठाकरे आज नाशिक आणि पुणे दौऱ्यावर; अतिवृष्टीग्रस्त भागांना देणार भेट

118 0

पुणे : परतीच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते.

शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असल्याची माहिती समोर आली होती. शिंदे-फडणवीस यांच्या या दौऱ्याआधी आदित्य ठाकरेंनी बाजी मारली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे गुरूवारीच मैदानात उतरणार आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत आदित्य ठाकरे पुणे आणि नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.
दौऱ्यात आदित्य ठाकरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेट देणार आहेत. नाशिकच्या सिन्नर तसंच पुण्यातल्या जुन्नर आणि शिरुरमध्ये आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी 12.00 वाजता सोनारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक दुपारी 2.00 वाजता वडगांव, आळेफाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. दशरथ लक्ष्मण केदार यांच्या पत्नी श्रीमती शांताबाई दशरथ केदार यांची भेट. दुपारी 3.15 वाजता मलठण, तालुका शिरूर जिल्हा पुणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची व भागाची पाहणी तसेच शेतकऱ्यांसोबत संवाद, त्यानंतर पत्रकार परिषद दुपारी 4.00 वाजता वाबळे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे दुपारी ०४.२० मौजे वरुडे, ता शिरूर, जिल्हा पुणे असा आदित्य ठाकरे यांचा दौरा असणार आहे

Share This News

Related Post

akola

Akola Violence: वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यात दोन गटात तुफान राडा; कलम 144 लागू (Video)

Posted by - May 14, 2023 0
अकोला : अकोला शहरातील जूने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा होऊन दगडफेक करण्यात आली आहे.…

महत्वाची घडामोड ! संभाजीराजे छत्रपती मुंबईच्या दिशेने रवाना ! मुख्यमंत्र्यांची घेणार भेट ?

Posted by - May 24, 2022 0
कोल्हापूर – संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री…
Winter Session

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Posted by - December 15, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू आहे. हे अधिवेशन दिवसेंदिवस वादळी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरात…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपाला द्यावं लागलं स्पष्टीकरण

Posted by - September 25, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपण किती काळ अर्थमंत्रीपदावर राहणार हे माहित…
Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Posted by - April 22, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने पक्षाची साथ सोडत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *