Arrest

ब्रेकिंग न्यूज ! पुण्यातील तरुणाला एटीएस कडून अटक, दहशतवादी संघटनेकडून फंडिंग केल्याचा संशय

471 0

पुणे- दहशतवादी संघटनेकडून फंडिंग होत असल्याच्या संशयावरून पुण्यातील एका तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने दापोडी परिसरातून अटक केली.  जुनेद मोहम्मद (वय 18) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता.

पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनूसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापुर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता. हे पैसे नेमके कशासाठी होते ? या पैशाचे काय केले जाणार होते हे मात्र अद्याप समोर आले नाही. या तरुणाला आज पुणे न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे.

जुनेद मोहम्मद हा अवघा 18 वर्षांचा असून तो बेरोजगार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. त्यानंतर राज्यात घातपाती कारवायांसाठी काश्मीरमधीलच एका संघटनेने त्याला महिनाभरापुर्वी 10 हजार रुपये पाठवले होते. त्याच्या बँक खात्यात हे पैसे टाकण्यात आले होते. काही दिवसांपासून एटीएस आरोपीच्या मागावर होते. अखेर त्याला दापोडी परिसरातून अटक करण्यात आली.

Share This News

Related Post

Suicide News

Suicide News : ‘ही’ दोस्ती तुटायची म्हणत 2 जिवलग मित्रांची ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या

Posted by - July 18, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना (Suicide News) समोर आली आहे. यामध्ये दोन जिवलग मित्रांनी धावत्या ट्रेनखाली उडी…
Summer

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Posted by - May 2, 2024 0
पुणे : देश पातळीवर सध्या हवामानात (Weather Update) असंख्य बदल होत असून, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राज्याराज्यानुसार तापमानाच मोठे चढ उतार होताना…

बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार! देशभरातील रिक्षा संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद

Posted by - December 3, 2022 0
पुणे : आज देशभरातील रिक्षा संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे.…

लाऊडस्पीकरवरून अजान हा मूलभूत अधिकार नाही, अलाहाबाद कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Posted by - May 6, 2022 0
नवी दिल्ली- धार्मिक स्थळांवरून भोंगे हटविण्याच्या मुद्द्यावरून उत्तरप्रदेश, महाराष्ट्रात राजकारण ढवळून निघाले आहे. मशिदींवरील भोंगे हटवा अन्यथा मशिदींसमोर मोठ्या आवाजात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *