ओबीसी राजकीय आरक्षणासाठी अनुभवसिद्ध पद्धतीने माहिती गोळा करावी

267 0

पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळविलेल्या माहितीच्या आधारीतच अंतिम अहवाल केला जावा, अशा मागणीचे निवेदन काँग्रेस ओबीसी विभागाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत सुरसे यांनी महाराष्ट्र राज्य समर्पित आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बाठिया यांना आज दिले.

ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशांत सुरसे यांनी बाठिया यांची भेट घेतली. यावेळी आप्पा पंडित उमेश काची, मोनिका खलाने, निलेश गौड, अक्षय सोनावणे गणेश साळुंके राजेश जाधव जीवन चाकणकर विल्सन डॅनियल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व आणि त्यांचे प्रमाण स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय निश्चित करण्यासाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारयाद्या आधार मानून त्यानुसार ओबीसींची संख्या निश्चित केली जावी, याकरिता शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळवलेल्या माहितीच्या आधारे अंतिम अहवाल करावा. न्यायव्यवस्थेला मान्य होईल असा ओबीसी राजकीय आरक्षण अहवाल सक्षम असावा, असे प्रशांत सुरसे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Share This News

Related Post

पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना पितृशोक

Posted by - February 5, 2022 0
पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे वडील नारायण केशव रासने (वय ९३) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात…
Pune News

Pune News : पुणे शहरात तब्बल ‘एवढ्या’ गणपतींचे झाले विसर्जन

Posted by - September 29, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपली. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…या…
Pune Crime News

Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - March 19, 2024 0
पुणे : पुण्यातून मैत्रीला काळिमा फासणारी घटना (Pune Crime News) समोर आली आहे. यामध्ये मैत्रीच्या वादातून एका 15 वर्षीय शाळकरी…

गाणगापूर एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये

Posted by - July 24, 2022 0
सोलापूर – गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *