१५ दिवसात अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा…. ; मुंबई महापालिकेचा राणा दांपत्याला अल्टिमेटम

279 0

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरातील अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा पालिका कारवाई करेल अशी नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी राणा दांपत्याला ७ ते १५ दिवसांची मुदत दिली आहे. महापालिकेच्या या नोटीशीनंतर राणा दांपत्य काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

खार येथील राणा दाम्पत्याच्या इमारतीचा अधिकृत आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्या व्यतिरिक्त बांधकाम का केलं ? असा प्रश्न नोटिशीतून पालिकेतील अधिकाऱ्यांनी विचारला आहे. पालिकेने दिलेल्या नोटिशीनंतर राणा दांपत्याला नियमिततेसाठी अर्ज करता येऊ शकतो. पण सध्या महाराष्ट्रातील राजकारण अधिक तापले असल्याने राणा दांपत्याच्या या अर्जावर पालिका किती विचार करू शकेल हा प्रश्न आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे

दरम्यान, ठाकरे सरकारने ही सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप राणा दांपत्याने केला आहे. खारमध्ये आमचे एकच घर आहे, सेनेतल्या नेत्यांसारखी आमची अनेक घरे नाहीत. ते आमचे घर पडू शकतात. यापूर्वी देखील त्यांनी अनेकांची मुंबईत घरे पाडली आहेत. असे राणा दांपत्याने म्हटले आहे.

Share This News

Related Post

उध्दव ठाकरेंची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार; शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित

Posted by - November 26, 2022 0
बुलढाणा: शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज शनिवारी (ता.26 नोव्हेंबर) बुलढाण्यात धडाडणार आहे बुलढाण्यातील चिखली…

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे विजयी

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर…

धक्कादायक : पुण्यात भाऊबीजेला माहेरी नेण्याचा हट्ट केला म्हणून पतीने आवळला पत्नीचा गळा

Posted by - October 28, 2022 0
पुणे : त्या दोघांचे सुरुवातीपासून प्रेम संबंध होते. अल्पवयीन असतानाच त्याने तिला पळून नेले. तरुणीला पळून नेल्याप्रकरणी त्याच्यावर FIR दाखल…

NANA PATOLE : राज्यातील ED सरकार महाराष्ट्रासाठी आहे का गुजरातसाठी ?

Posted by - August 9, 2022 0
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार…

श्री देवी चतुःशृंगीचे दर्शन एका क्लिकवर ; या नवरात्र उत्सवापासून देवस्थान ट्रस्टची भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था

Posted by - September 21, 2022 0
श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना या नवरात्र उत्सवामध्ये देवीचे मनभरून आणि सहज दर्शन व्हावे यासाठी विशेष नियोजन करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *