लालमहालात लावणी नृत्य केल्यावरून वैष्णवी पाटील हिचा माफीनामा

310 0

पुणे- पुण्यातील ऐतिहासिक लाला महालात लावणी नृत्याचे शूटिंग केल्यावरून सध्या वैष्णवी पाटील आणि कुलदीप बापट यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या प्रकरणावर आता वैष्णव पाटील यांनी आपला माफीनामा तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये वैष्णवी पाटील म्हणते की, अर्धवट ज्ञानातून बालबुद्धीने आमची चूक झाली. आम्हाला माफ करा !

सध्या गाजत असलेल्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर नृत्यांगना वैष्णवी पाटील नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या प्रकारचा अनेक सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला. संभाजी ब्रिगेडने याचा तीव्र शब्दात निषेध केला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील लाल महाल हे लावणी नृत्य करण्याचे ठिकाण नाही अशा शब्दात झापले होते.

एकूणच या व्हिडिओवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच या व्हिडिओमध्ये लावणी नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटील यांनी इंस्टाग्रामवर लाइव्ह येत आपला माफीनामा दिला आहे.

काय म्हणाली वैष्णवी पाटील ?

“काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील लाल महालात चंद्रा लावणी या डान्सचा व्हिडीओ केला होता. तो व्हिडीओ करत असताना माझ्या ध्यानीमनीसुद्धा आलं नव्हत की अस काही होईल. मी एक डान्सर म्हणून तो व्हिडीओ केला. शिवप्रेमींचं आणि तुम्हा सर्वांचे मन दुखावण्या माझा अजिबात हेतू नव्हता. मी स्वत: शिवप्रेमी आहे. माझ्याकडून चूक झाली हे मला कळलं आणि ज्याक्षणी मला ते कळलं त्याक्षणी मी त व्हिडीओ डिलिट केला होता. परंतु डिलिट करण्याआधीच तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि खूप ठिकाणी शेअर झाला. आताही मी चाहत्यांना विनंती करतेय की तो व्हिडीओ डिलिट करा. मी लाल महालात व्हिडीओ करण्याची चूक केली. मी जाणूनबुजून ती चूक केली नव्हती. मी माझी चूक मान्य करते. मी सर्वांची माफी मागते एक मराठी मुलगी आणि शिवकन्या असल्याचा मला अभिमान आहे. मी पुन्ह कधीच अशी चूक करणार नाही”

वैष्णवी पाटीलचा माफीनामा पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://www.instagram.com/p/CdyTF-eD5T6/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

Share This News

Related Post

महामेट्रोकडून पुण्यात नवीन सात मार्ग प्रस्तावित, कोणते आहेत हे नवीन मार्ग ?

Posted by - February 11, 2022 0
पुणे- पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने एल अॅण्ड टी कंपनीकडून तयार करून घेतलेल्या ‘ सर्वंकष वाहतूक आराखड्यात सुमारे १९५.२६ किलोमीटर…

अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावा, भाजप किसान मोर्चाचे पुण्यात धरणे आंदोलन

Posted by - May 5, 2022 0
पुणे – राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आजपासून पुण्यातील साखर संकुल कार्यालयासमोर भाजप किसान मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन…

#कसबापोटनिवडणूक : हेमंत रासने सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

Posted by - February 5, 2023 0
पुणे: भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाले असून या पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी प्रमाणपत्र देण्यास अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध

Posted by - September 10, 2023 0
नागपूर : मराठा समजाला ‘सरसकट’ कुणबी जातीचे प्रमाणपत्र (Maratha Reservation) देण्याला अखिल भारतीय ओबीसी महासंघाकडून विरोध करण्यात आला आहे. शनिवारी…
Pune News

Pune News : बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे-हर्षदा फरांदे

Posted by - December 4, 2023 0
पुणे : पुणे (Pune News) शहारामध्ये मोठ्या संख्येने महिला गृहिणी बचतगटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन व विक्री करतात व त्यातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *