पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे आरओ प्रकल्प व थेट दर्शनसेवेचा शुभारंभ

300 0

पुणे – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आरओ प्रकल्पयुक्त पाणपोई व जगद्गुरु तुकोबारायांच्या थेट डिजिटल दर्शन सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार सुनील शेळके, उद्योगपती दिना धारिवाल, प्रकाश धारिवाल, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितिन महाराज मोरे, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, विश्वस्त संदीप राक्षे, स्मिता चव्हाण व देहूचे ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “एलईडी पटलाच्या माध्यमातून भाविकांना जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे दर्शन घेता येईल. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षात आषाढी पालखी सोहळा झाला नव्हता. यंदा मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरीच्या वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे सर्वच भाविकांना दर्शन घेता येत नाही. त्यामुळे नवी सुविधा उपयुक्त ठरेल. पाणपोईच्या माध्यमातून भाविकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात मिळू शकेल” अशी सेवा देणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

संत तुकाराम महाराजांचे शिल्प इंद्रायणी नदीत उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा. भाविकांची वाढती संख्या पाहून भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

 

Share This News

Related Post

Pune Death

पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले; Video आला समोर

Posted by - May 29, 2023 0
पुणे : पुण्याच्या कर्वेनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकीस्वाराने एका महिलेला उडवले. ही…
Nagpur Accident

Nagpur Accident : समृद्धी महामार्गावर डॉक्टर मायलेकाच्या गाडीचा भीषण अपघात; आईचा दुर्दैवी अंत, तर मुलाची तब्येत चिंताजनक

Posted by - August 26, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावरून जात असताना डॉक्टर मायलेकाच्या गाडीचा भीषण अपघात झाला.…

पुण्यातील चॉईस उद्योग समूहावर आयकर विभागाची छापेमारी

Posted by - December 14, 2022 0
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळपासून पुण्यातील एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकासह त्याच्याशी संबंधित विविध व्यावसायिक कंपन्यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यास सुरुवात केली.…
Sharad Pawar And Ajit Pawar

Maharashtra Politics : पुलोद सरकार ते अजित पवार बंड..! ‘या’ घटनांमुळे घडला होता महाराष्ट्रात राजकीय भूकंप

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नाट्यमय घडामोडी घडत आहे. नुकतच अजित पवारांनी सत्ताधारासोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *