युएसबी टाईप – सी पोर्टसह नवीन iPhone; लवकच बाजारात येऊ शकतो

237 0

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि बाजारपेठेतील मागणीनंतर आता अॅपल आपला आयफोन यूएसबी टाइप-सी पोर्टसह लॉन्च करणार असल्याचे वृत्त आहे. नवीन आयफोनमध्ये यूएसबी टाइप-सी मिळेल, जो 2023 मध्ये लॉन्च होईल अशी माहिती अनेक रिपोर्ट्स मधून आली असल्याचे सांगितले जात आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की Apple यूएसबी टाइप-सी पोर्टसह नवीन आयफोनची चाचणी करत आहे. या वर्षी लॉन्च होणाऱ्या आयफोनमध्ये लाइटनिंग पोर्ट उपलब्ध असेल. परंतु त्यानंतर, आयफोन 15 टाइप-सी पोर्टसह ऑफर केला जाईल. परंतू Apple ने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली नाही.

सध्या, iPad Pro, iPad Air आणि iPad Mini USB Type-C पोर्टसह उपलब्ध आहेत. युरोपियन युनियन अनेक दिवसांपासून युनिव्हर्सल चार्जरची मागणी करत आहे. सर्व गॅजेट्स चार्ज करण्यासाठी एकाच प्रकारचे चार्जर वापरावे, असे युरोपियन युनियनचे म्हणणे आहे. हा आयफोन लॉन्च झाल्यास युजर्सना सोपे होणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातही घट होणार आहे.

Apple सध्या iPhone 14 सीरिजवर काम करत आहे. या सीरीज अंतर्गत, iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

Share This News

Related Post

BEAUTY TIPS : हिवाळ्यात केस गळतीने वैतागले आहात ? बाजारातील महागड्या प्रॉडक्ट्सपेक्षा ‘हे’ घरगुती उपाय लवकर परिणाम मिळवून देतील

Posted by - December 24, 2022 0
हिवाळ्यामध्ये होणारी केस गळती ही खरंतर सामान्य आहे. केसात कोंडा होणे, केस कोरडे होणे अशा समस्या हिवाळ्यात अवश्य जाणवतात. पण…

डब्यात रोज पोळी भाजी खाऊन मुलं कंटाळलेत ? अगदी पाच मिनिटात बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा

Posted by - October 10, 2022 0
घरी भरून येणारी प्रत्येक गोष्ट ही गृहिणीला खूप आवडत असते. जसे की बाजारातून घरी येताना वेगवेगळ्या भाज्या, किराण्याच्या दुकानातून येणा-या…
Gold Scheme

Gold Scheme : स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक

Posted by - June 19, 2023 0
आजपासून स्वस्त सोने खरेदी (Gold Scheme) करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) अंतर्गत आजपासून 23 जून पर्यंत…
Chanakya Niti

Chanakya Niti : नवऱ्याच्या ‘या’ अवयवाला बायकोने स्पर्श करताच त्यांच्यातील प्रेम वाढते

Posted by - August 12, 2023 0
महान विद्वानांपैकी एक असलेल्या आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी मानवी जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. विशेषतः पती-पत्नीच्या नात्याबाबतदेखील त्यांनी काही…

एटीएम पिन 4 अंकीच का..? जाणून घ्या यामागील रंजक कारण…

Posted by - February 26, 2022 0
‘एटीएम’ बँकिंग इतिहासातील सर्वात मोठी देणगीच म्हणावी लागेल.बँक आपल्या खातेदारांना एक कार्ड देते जे त्या बँकेच्या एटीएम मशीन मध्ये टाकून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *