धक्कादायक ! मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र, तिघांविरोधात गुन्हा

295 0

पुणे- मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर पोलीस आणि वैद्यकीय विभागाने या मोटारीचा पाठलाग करून या बेकायदा केंद्राचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण पोपटराव देशमुख ( वय 32), तौसिफ अहमद शेख ( वय 20, दोघे रा. राजळे, सातारा ) तसेच एका व्यक्तीच्या विरोधात इंदापूर पोलिसांनी गर्भधारण पूर्व प्रसवपूर्व निदान तंत्र ( लिंग निवडीस प्रतिबंध ) 1994 सुधारित 2003 कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याची माहिती इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर यांना मिळाली. त्यानंतर डॉ. खामकर, डॉ एकनाथ चंदनशिवे, डॉ. श्रीकृष्ण खरमाटे, डॉ . अमोल खनावरे यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

त्यानंतर वैद्यकीय पथक आणि पोलिसांनी या मोटारीचा पाठलाग सुरु केला. इंदापुर-अकलूज रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दांपत्याने या मोटारीत प्रवेश केला. त्यानंतर मोटार भरधाव वेगाने निघाली. भांडगाव परिसरात एका ओढयाजवळ मोटार थांबली असता पोलीस आणि वैद्यकीय पथकाने त्वरित कारवाई करत मोटारीची तपासणी केली. या मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर मोटारचालक तौसिफ़ शेख, प्रवीण देशमुख तसेच पत्नीची गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांच्या पथकाने केली.

 

Share This News

Related Post

मावळ : एकवीरामाता देवी मंदिर विकासासाठी राज्यसररकडून ४० कोटीचा निधी; खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अधिकाऱ्यांना विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना

Posted by - January 25, 2023 0
मावळ : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला वेहरगावं येथील कुलस्वामिनी आई एकवीरामाता देवी मंदिर विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

शिवाजी महाराजांचा असा अपमान आपल्याला सहन करायचा असेल तर… ! आणि उदयनराजेंना झाले अश्रू अनावर

Posted by - November 28, 2022 0
सातारा  : छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान सहन करण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी आगतिकता खासदार उदयनराजे भोसले…
mumbra

सेलोटेपमध्ये गुंडाळलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश

Posted by - June 14, 2023 0
ठाणे : 27 मे रोजी ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात खाडी किनारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह चादरीमध्ये बांधून सेलो टेपच्या…

मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार, ठाकरे सरकारला घेरण्याची भाजपाची रणनीती

Posted by - March 2, 2022 0
मुंबई- दाऊदशी व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी सरकार उभे राहिले आहे. पोलीस कोठडीत गेल्यानंतरही एखादी…

अखेर… अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र मुक्काम कारागृहातच, कारण…

Posted by - June 16, 2022 0
  ठाणे- गेले काही दिवस राज्यात केतकी चितळे हे नाव राज्यात चर्चेत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *