पुण्यात गाजलेल्या किडनी तस्करी प्रकरणी रूबी हॉल क्लिनिकचे डॉ परवेझ ग्रँटसह तब्बल 15 जणांवर गुन्हा

433 0

पुणे- पुण्यात गाजलेल्या किडनी तस्करी प्रकरणी रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रँट, युरोलॉजिस्ट डॉ भूपत भाटी, कन्सल्टंट नेफरोलॉजिस्ट डॉ अभय सद्रे, युरोलॉजिस्ट डॉ हिमेश गांधी, ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या डेप्युटी डायरेक्टर मेडिकल रेबेका जॉन, ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर सुरेखा जोशी, अमित अण्णासाहेब साळुंखे, सुजाता अमित साळुंखे, सारिका गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंखे, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवि गायकवाड आणि अभिजीत मदने अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डॉक्टर संजोग सीताराम कदम यांनी फिर्याद दिली आहे.

एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ऑगस्ट 2019 चे मार्च 2022 या काळात ग्रँट मेडिकल फाउंडेशन रुबी हॉल हॉस्पिटल या ठिकाणी आरोपी अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, रवि गायकवाड आणि अभिजीत मदने यांनी संगनमत करून बनावट कागदपत्र तयार केली. हे कागदपत्र त्यांनी ग्रँड मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी सादर केली.

या कागदपत्रांची सखोल तपासणी न करता आरोपी रेबिका जॉन, मंजुषा कुलकर्णी, डॉ. अभय सद्रे, डॉ.भुपत भाटे, डॉ. हिमेश गांधी, सुरेखा जोशी यांनी ही कागदपत्रे रीजनल अथोरिझेशन कमिटीकडे पाठवली. रिजनल औथरायझेशन कमिटी, बी जे मेडिकल कॉलेज, ससून रुग्णालयाची त्यांनी दिशाभूल करून त्यांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 चे कलम 10 चे उल्लंघन केले. हा सर्व प्रकार रूबी हॉल क्लिनिक येथे घडला. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर या महिलेने पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती.

या सर्व प्रकाराला रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट हे देखील मॅनेजिंग ट्रस्टी या नात्याने तितकेच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Stamp Paper

Stamp Paper : 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार रद्द

Posted by - September 27, 2023 0
मुंबई : प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून रद्द होणार…

‘वन्समोअर रफीसाहब’ : पुणे नवरात्रौ महोत्सवात महंमद रफींच्या गाण्यांमध्ये रसिक प्रेक्षक दंग

Posted by - September 27, 2022 0
पुणे : स्वरसम्राट महमंद रफी यांचे सदाबहार हिंदी गीतांचा कार्यक्रम ‘वन्समोअर रफीसाहब’ हा कार्यक्रम रसिकांच्या मनात महमंद रफींच्या आठवणी जागवून…

बुलेटराजांच्या पुंगळ्या टाइट ! कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

Posted by - November 15, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवत बुलेटचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी तब्बल 195 बुलेटचालकांकडून…
Baramati Accident

Baramati Accident : बारामतीमध्ये भरधाव कारच्या धडकेत 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 4, 2023 0
बारामती : बारामतीमध्ये (Baramati Accident) एका रस्ते अपघाताने दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने धडक दिल्याने त्यांना…

BIG BREAKING : रविवार पेठ येथे तारा मॉल टेरेसवर असलेल्या प्लास्टिक टाक्यांना भीषण आग

Posted by - October 28, 2022 0
पुणे : रविवार पेठेतील तांबोळी मज्जिद येथे असलेल्या तारा मॉलच्या टेरेसवर प्लास्टिकच्या टाक्यांना भीषण आग लागली आहे. फायर ब्रिगेडच्या मुख्यालयामधून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *