‘संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याच्या विरोधात दिल्लीत एफआयआर दाखल करणार’

129 0

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीच कामाचे नाहीत. राज्य कसे चालवायचे ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिका असा सल्ला नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. संजय राऊत यांनी आम्हाला 20 फूट गाडण्याची भाषा केली असल्याचा आरोप करत त्यांनी याची तक्रार अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचे त्या म्हणाल्या. नवनीत राणा आणि रवी राणा सोमवारी सकाळी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नवनीत राणा यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींसोबत अशी वर्तवणूक होत असेल तर सामान्य लोकांचे काय होत असेल ? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून तुरुंगात झालेल्या छळाची माहिती त्यांना देणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्हाला २० फूट खोल गाडण्याची धमकी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात मी दिल्लीत एफआयआर दाखल करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याची तक्रार करणार आहे.

मुंबई पोलिसांनी आमचा पोलीस ठाण्यात छळ केला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. आम्हाला खार पोलीस ठाण्यात पोलिसांना चहा पाजला. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला जामिनावर सोडू, असे सांगितले. मात्र, त्यानंतर कोणालाही पत्ता न लागू न देता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री साडेबारा वाजता आम्हाला सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी तुम्हाला उद्या सकाळी न्यायालयात नेऊ, असे सांगण्यात आले. सकाळी पाच वाजेपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजीही देण्यात आली नव्हती.

दरम्यान, आम्ही कोर्टाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले नसल्याचा दावा राणा दाम्पत्याने केला आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करत असून त्यांनी दिलेल्या चौकटीत वक्तव्य करत असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही हनुमान चालीसा, मातोश्री असा शब्ददेखील उच्चारला नसल्याचा दावा त्यांनी केला.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

राज्यात सत्ता असल्याने शिवसैनिकांचा माज पोलिसांच्या जीवावर आहे, असा आरोप राणा दाम्पत्यासह भाजप नेत्यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला राऊतांनी खास सेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं. “आम्ही शिवसैनिक जन्मत: माजोरडे आहोत, आमच्या नादाला लागले तर २० फूट खाली गाडू. जर तुमची आमच्या नादाला लागण्याची इच्छाच असेल तर मग तुमच्या गोवऱ्या अगोदर स्मशानात नेऊन ठेवा आणि मग मैदानात या”, अशा शब्दात संजय राऊतांनी राणा दाम्पत्यासह भाजप नेत्यांनी इशारा दिला.

Share This News

Related Post

ATM

ATM कार्डवर 16 अंकी नंबर कशासाठी असतो? त्या नंबरचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

Posted by - June 23, 2023 0
सध्या सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आल्याने सगळे व्यवहार डिजिटल झाले आहेत. त्यामुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या चकरा मारणे बंद झालेला आहे.…

घरगुती भांडणातून सासूने असा घातला वर्मी घाव; सुनेचा जागीच मृत्यू, नंतर असा लपवायचा केला प्रयत्न

Posted by - March 8, 2023 0
पुणे : घरगुती भांडणातून सासूने सुनेला केलेल्या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,…

कोरोना काळातील व्यापाऱ्यांवरील खटले विनाविलंब मागे घेणार – देवेंद्र फडणवीस

Posted by - August 11, 2022 0
पुणे: शासनाने एप्रिल २०२१ मध्ये परत लॉक डाउन लावल्याने हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शांततामय मार्गाने साखळी आंदोलन केले…

एसटी विलीनीकरणाची शक्यता मंत्रिमंडळाने फेटाळली

Posted by - March 3, 2022 0
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मुख्य सचिवांच्या समितीने फेटाळली. 90 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण व्यावहारिक नसून त्यातून…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला ‘विशेष प्रोटोकॉल’ नको; एकनाथ शिंदेंचे पोलीस महासंचालकांना आदेश

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असा आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. ताफ्यासाठी लागू केलेल्या विशेष प्रोटोकॉलमुळे वाहतुकीचा खोळंबा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *