महत्वाची बातमी !! मंत्री नवाब मलिक यांचा साथीदार सुहेल खांडवानी घरावर एनआयएचा छापा

431 0

मुंबई- ईडीच्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांचा साथीदार सुहेल खांडवानी याच्या घरावर एनआयए ने छापा टाकला आहे. खांडवानी हा १९९३ च्या मुंबई साखळी बॉंबस्फोट प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. 

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे हस्तक आणि निकटवर्तीयांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी पहाटे मुंबईतील २० ठिकाणांवर धडक कारवाई केली आहे. आजच्या कारवाईसाठी मुंबईतील एनआयएच्या मुख्यालयाबाहेर दोन गाड्यांमधून सीआरपीएफचे जवान आले होते. त्यानंतर सीआरपीएफ जवान एनआयएच्या पथकांबरोबर कारवाईसाठी रवाना झाले. काही छापे माहीम परिसरात टाकण्यात आले. माहीम दर्ग्याचे ट्रस्टी सुहेल खंडवानी यांच्या घरावर एनआयएने छापा टाकला असून त्याठिकाणी सध्या झाडाझडती सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतरच सुहेल खंडवानी यांचे नाव सातत्याने पुढे येत होते. त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात होती. अखेर एनआयएने सोमवारी पहाटे चार वाजता सोहेल खंडवानी यांच्या घरावर छापा टाकला. सुहेल खंडवानी यांच्या घरात सध्या एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून शोध मोहीम सुरु आहे. याशिवाय, माहीम परिसरात राहणाऱ्या १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीच्या घरावरही एनआयचे पथक पोहोचले आहे.

२० ठिकाणांमध्ये शार्प शूटर, तस्करांचा हात आहे. याशिवाय अनेक ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. असं सांगण्यात येतंय की, मुंबईत एनआयएची कारवाई सुरु आहे. मुंबईच्या नागपाडा, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजारात छापेमारी सुरु झाली आहे. दाऊदशी संबंधित अनेक हस्तक, ड्रग स्मगलर आणि असे अनेक लोक आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने फेब्रुवारी महिन्यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे. आजची कारवाईही त्याचाच एक भाग आहे.

Share This News

Related Post

ऋण वसुली न्यायाधिकरण आयोजित लोकन्यायालयामध्ये ६०४ कोटी रुपयांची वसुली

Posted by - December 26, 2022 0
पुणे : ऋण वसुली न्यायाधिकरण पुणे यांच्यावतीने आयोजित लोकन्यायालयामध्ये २३० खटल्यांच्या तडजोडीतून ६०४ कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती न्यायाधिकरणाचे…

अनंत अंबानीचे पुन्हा एवढे वजन कसे वाढले ? स्वतः आई नीता अंबानी यांनी सांगितले ‘हे’ कारण !

Posted by - January 28, 2023 0
मुंबई : सध्या अनंत अंबानी यांच्या साखरपुड्यातील फोटोंमुळे ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. पण यावेळी ते त्यांच्या अति स्थूलपणामुळे…
mahaganapati

मंदिर प्रवेश बॅनरबाबत काय म्हणाले रांजणगाव गणपती देवस्थान?

Posted by - May 19, 2023 0
पुणे : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) येथील श्री महागणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना…

महाविकास आघाडी आणि शिवसेना अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभी- संजय राऊत

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास…

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल काँग्रेसचा हात सोडत पक्षाच्या सदस्यपदाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *