तिरुपती दर्शनानंतर पुण्यात आलेल्या वसंत मोरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…(व्हिडिओ)

588 0

पुणे- तिरुपती दर्शन घेऊन पुण्यात परतलेले मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण पक्ष पुण्यात होता. त्यामुळे पक्षाचे नेते असतील, नवीन शहराध्यक्ष असेल, एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कुणी लढाई हरत नाही.

तिरुपती बालाजी आणि त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन ते पुण्याला परतले. वसंत मोरे म्हणाले की, ठाण्याच्या सभेवेळी आदल्या दिवशी राज साहेबांनी मला बोलवून ठाण्यातील सभेला त्यांनी यायला सांगितले होते.त्याचवेळी माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम होता, पण मी त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता ठाण्याच्या सभेला गेलो. मी जर ठाण्याच्या सभेला गेलो नाही, तर संभ्रम निर्माण होईल, म्हणून मी तिथे गेलो. त्यामुळे मी मनसेत नाराज असल्याच्या चर्चेला काही अर्थ नाही.

सतरा – अठरा वर्ष झाली मी बालाजीच्या दर्शनाला दरवर्षी जात असतो. अक्षय्य तृतीयेच्या दरम्यानच जात असतो. मागील दोन वर्ष कोरोनामुळे जाता आले नाही . मार्च – एप्रिलनंतर मी निवडून येईल आणि बालाजीला जाईन म्हणून जवळपास दीड महिने आधीच रिझर्वेशन केले होते. या काळामध्ये सगळे मनसे नेते संपर्कात होते असेही वसंत मोरे म्हणाले.

आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिले. वसंत मोरे म्हणाले, “स्वामी विवेकानंदांचे ते स्टेटस मला आवडते . ज्यावेळेला तुमचा संघर्ष होत असतो , निंदानालस्ती होत असते , ज्यावेळी तुम्हाला अडचणी येतात तेव्हा समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात”

Share This News

Related Post

Breaking ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट, राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचे ई-मेल

Posted by - April 1, 2022 0
नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचे…

National Crime Records Bureau : महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार राजस्थानात ; महाराष्ट्र 4 क्रमांकावर 

Posted by - July 22, 2022 0
मुंबई : देशात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात राजस्थान प्रथम क्रमांकावर तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.…

उद्योग क्षेत्रातील मंडळींसाठी ‘सेन्सर टेक्नॉलॉजी’ चे प्रदर्शन

Posted by - March 3, 2022 0
उद्योगक्षेत्रात सेन्सर टेक्नॉलॉजी म्हणजेच संवेदना असणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात होत असून यासाठीच केंद्र सरकारच्या समर्थ उद्योग भारत अंतर्गत…

आगाखान पॅलेस येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार ; स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य आणि त्याग प्रेरणादायी-केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

Posted by - August 12, 2022 0
पुणे : स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे. त्यांचा सन्मान करताना मनात देशाविषयी…

#PUNE : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार उतरणार मैदानात

Posted by - February 17, 2023 0
पुणे : कसबा पोटनिवडणुकेचा प्रचार सध्या जोरदार सुरु आहे. प्रमुख पक्षांसह सर्वच उमेदवार आणि समर्थक मैदानात उतरून प्रचाराचा धडाका लावता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *