अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

281 0

पुणे – सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक करण्यात आला. मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला घातलेला पोशाख… श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीचे पुष्पाभिषेक केल्यानंतर दिसणारे विलोभनीय रुप… मंदिराचा गाभारा व सभामंडपातील विविधरंगी पुष्पांची आरास पाहण्याकरिता देवीभक्तांनी गर्दी केली. यावेळी आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने अक्षयतृतीयेच्या निमित्ताने वासंतिक मोगरा व आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते.

मोग-याच्या फुलांनी मंदिराचा परिसर खुलून गेला होता. तब्बल १५१ किलो मोगरा, २५१ गुलाबाच्या फुलांच्या गड्डया, चाफा, जाई-जुई, गुलछडी, झेंडू यांसह अनेक फुलांची आरास करण्यात आली. तसेच मंदिरात आंबा महोत्सव देखील साजरा करण्यात आला. तब्बल २ हजार आंब्याचा महानैवेद्य देवीला दाखविण्यात आला होता. श्री महालक्ष्मी देवीसह श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीसमोर आंब्याचा महानैवेद्य दाखविण्यात आला. फुलांची आरास आणि आंबा महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. सामाजिक संस्थांना आंबे प्रसाद म्हणून देणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Share This News

Related Post

पुणे : वानवडी येथे पञ्याच्या घरांना आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Posted by - November 11, 2022 0
पुणे : काल दिनांक १०•११•२०२२ रोजी राञी ११•३२ वाजता अग्निशमन दलाकडे वानवडी, शिवरकर गार्डनच्या मागे शिवरकर चाळ येथे घराला आग…

शिवसेना की भाजपा ?अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा कुणाला

Posted by - October 15, 2022 0
मुंबई: शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून…

केस गळतीने हैराण झाले आहात ? या घरगुती उपायांनी केवळ आठ दिवसात थांबू शकते केस गळती

Posted by - October 11, 2022 0
केस गळणे हा आजार नसून केवळ एक समस्या आहे. केस गळतीची अनेक कारणे असतात. यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण, ताणतणाव, कोंडा किंवा…
Remel Cyclone Update

Remel Cyclone Update : रेमल चक्रीवादळ मध्यरात्री धडकणार; हवामान विभागाने जारी केला रेड अलर्ट

Posted by - May 27, 2024 0
मुंबई : रेमल चक्रीवादळ (Remel Cyclone Update) कधीही धडकणार असल्यामुळे हवामान विभागाने बंगालमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छिमारांना समुद्रात…
Jayant Patil

Jayant Patil : जयंत पाटील भाजपात जाणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Posted by - June 20, 2023 0
पुणे : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट (Sanjay…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *