जिओ , एअरटेल, व्हीआय चे आकर्षक प्लॅन सादर, तुमच्यासाठी योग्य प्लॅन निवडा

535 0

Jio, Airtel आणि VI (Voda-Idea) ने त्यांच्या ग्राहकांसाठी 30 दिवस आणि एक महिना वैधता असलेले प्लॅन लाँच केले आहेत. यापूर्वी, 28 दिवसांची वैधता असलेल्या प्लॅन मुळे ग्राहकांना महिन्याच्या शेवटी पुन्हा रिचार्ज करावे लागत होते. मात्र आता नव्या रिचार्ज प्लॅनमुळे या समस्येतून ग्राहकांची सुटका होणार आहे. आम्ही तुम्हाला कंपन्यांच्या अशा प्लॅनची माहिती देत आहोत, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह अनेक सुविधा उपलब्ध असतील.

जिओ

256 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची वैधता 1 महिन्याची असेल. म्हणजेच, जर तुम्ही हा प्लॅन 1 मे रोजी खरेदी केला तर पुढील रिचार्ज 1 जूनला करावा लागेल. यामध्ये दररोज 1.5GB डाटा व्यतिरिक्त अमर्यादित व्हॉईस कॉलची सुविधा मिळणार आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅपचे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध असेल.

296 रुपयांचा प्लॅन

जिओ फ्रीडम प्लॅन अंतर्गत 30 दिवसांची वैधता देत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 25GB डाटा दिला जातोय. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे. तसेच दररोज 100 एसएमएस यासोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडची सुविधाही मोफत दिलेली आहे.

एअरटेल

296 रुपयांचा प्लॅन

यामध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि एकूण 25GB डाटा देण्यात आला आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. याशिवाय, यामध्ये Amazon Prime Video Mobile Edition 30 दिवसांसाठी मोफत, तीन महिन्यांसाठी Apollo 24×7 सर्कल आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक समाविष्ट आहे.

319 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2GB हाय-स्पीड डाटा मिळेल. ही योजना पूर्ण महिन्याच्या वैधतेसह देण्यात आली आहे. यामध्ये Amazon Prime Video Mobile Edition 30 दिवसांसाठी मोफत तसेच तीन महिन्यांसाठी Apollo 24×7 सर्कल आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील समाविष्ट करण्यात आला आहे.

VI (Voda-Idea)

319 रुपयांचा प्लॅन

यामध्ये अमर्यादित कॉल्स, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2GB हाय-स्पीड डाटा मिळेल. ही योजना पूर्ण महिन्याच्या वैधतेसह देण्यात आली आहे. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. याशिवाय VI Movie TV चा मोफत मिळेल.

327 रुपयांचा प्लॅन

यामध्ये ग्राहकांना एकूण 25 जीबी डाटा मिळेल. याशिवाय यामध्ये दररोज 100 एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध असेल आणि त्याची वैधता 30 दिवसांची आहे. याशिवाय VI Movie TV मोफत उपलब्ध असेल.

337 रुपयांचा प्लॅन

यात एकूण 28 जीबी डाटा मिळेल आणि त्याची वैधता 31 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. याशिवाय VI Movie TV मोफत असेल.

Share This News

Related Post

टायगर श्रॉफच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ‘हिरोपंती 2’ चा ट्रेलर रिलीज (व्हिडिओ)

Posted by - March 17, 2022 0
मुंबई- टायगर श्रॉफचे चाहते बऱ्याच दिवसांपासून ‘हिरोपंती 2’ चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.…
Headphones VS Earphones

Headphones VS Earphones : हेडफोन की ईयरफोन काय आहे अधिक सुरक्षित ?

Posted by - June 23, 2023 0
हल्ली हेडफोन आणि ईयरफोनचा (Headphones VS Earphones) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण याचा वापर करताना दिसत आहे.…
Immunity

Immunity Boost : आजारांपासून राहायचं असेल दूर, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खा ‘या’ 7 गोष्टी

Posted by - December 31, 2023 0
आजारांपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची प्रतिकारशक्ती (Immunity Boost) कमकुवत असेल तर सर्दी, खोकला…

भाई म्हटलं नाही म्हणून तरुणाला कुत्र्यासारखी बिस्किटे खायला लावली; पिंपरी चिंचवडमधील घटना

Posted by - January 28, 2022 0
पिंपरी- भाई म्हटलं नाही म्हणून गावगुंडांच्या टोळक्याने एका तरुणाला कुत्र्यासारखी बिस्कीट खायला लावून बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना…
High Cholesterol

High Cholesterol : रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलं तर शरीरात दिसू लागतात ‘हे’ 4 बदल

Posted by - August 11, 2023 0
प्रत्येकाची इच्छा असते की, आपण फीट आणि फाईन रहावं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र चुकीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *