राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यातून १५ हजार मनसैनिक जाणार

216 0

पुणे- हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची जोरदार चर्चा सुरु आहे. या सभेपूर्वी राज ठाकरे हे पुण्यात जाणार आहेत. पुण्यातूनच राज ठाकरे औरंगाबादच्या सभेसाठी रवाना होणार आहे. आज दुपारी चार वाजता राज ठाकरे यांचे पुण्यात आगमन होणार असून त्यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे.

आज राज ठाकरे पुण्याला जाण्यासाठी घरातून बाहेर पडताच ठिकठिकाणी त्यांचे स्वागत केले जात आहे. राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा ज्या परिसरातून जात आहे, त्याठिकाणी मनसैनिकांची गर्दी होत आहे. आतापर्यंत वाशी, चेंबूर आणि पनवेल याठिकाणी राज ठाकरे यांचे मनसैनिकांनी जोरदार स्वागत केले आहे. वाशीमध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. आता पुढील रस्त्यातही राज ठाकरे यांचे असेच जोरदार स्वागत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज ठाकरे उद्या (दि. ३०) सकाळी ८ वाजता पुण्यातून औरंगाबादला रवाना होणार आहेत. वाटेत वढू बुद्रुक तुळापूर येथे संभाजी महाराजांच्या समाधीची पूजा करून औरंगाबादच्या दिशेने निघणार आहेत. या सभेसाठी राज ठाकरे यांच्या सोबत पुण्यातून तब्बल १० ते १५ हजार कार्यकर्ते आणि १५० गाड्यांचा ताफा असणार आहे. त्याशिवाय अयोध्येतून २५०० कार्यकर्ते येणार आहेत. अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी राज ठाकरे यांच्या सभेला पाठिंबा दर्शवला आहे.

भीम आर्मीचा इशारा

राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली तर सभा उधळून लावू असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला होता. आता पोलिसांनी परवानगी दिली आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्यास घोषणा देऊन सभा उधळून लावू असा इशारा भीम आर्मीने दिला आहे.

Share This News

Related Post

गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ‘ठाकरी तोफ’

Posted by - April 23, 2023 0
जळगाव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रविवार (23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील…

विधानपरिषद निवडणूक: शेकापच्या जयंत पाटील यांचा दारुण पराभव

Posted by - July 12, 2024 0
विधान परिषदेच्या 11 जगांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असुन मतमोजणी देखील संपन्न झाली असून या निवडणूकीत महाविकास आघाडीचे सर्व…

ओबीसी आरक्षणाबाबत राजकारण करू नका ; छगन भुजबळ यांचं आवाहन

Posted by - March 4, 2022 0
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाचा आंतरिम अहवाल फेटाळल्यानंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच फेटला आहे ओबीसी…

महत्वाची बातमी ! यंदा पायी पालखी सोहळा रंगणार, जाणून घ्या, यंदा माऊलींची पालखी कधी निघणार

Posted by - April 13, 2022 0
आळंदी- समस्त वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पायी वारी करून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. कोरोनामुळे गेली दोन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *