गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय-नाशिक’च्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  उद्घाटन

438 0

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक नवीन प्रशासकीय इमारत, वसतीगृह, भोजनालय संकूलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार हिरामण खोसकर, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालिका अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य अशोक नखाते आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाची नवीन इमारतीची रचना :

प्रशासकीय इमारत तीन मजली असून या इमारती मध्ये आठ प्रशिक्षण वर्ग, सि.सि.टी.एन.एस. प्रयोगशाळा, न्यायवैद्यक,अंगुलीमुद्रा प्रयोगशाळा, स्टुडीओ, वाचनालय,सभागृह, प्राचार्य, उप प्राचार्य, पोलीस निरीक्षक, मंत्रालयीन कर्मचारी यांचे कक्ष, स्वच्छतागृह व इंटरनेटसह अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. वसतीगृह इमारत आठ मजली असून या इमारती मध्ये प्रशिक्षणार्थी यांचे निवासाचे सुविधेकरीता 114 रुम ( प्रत्येक रुम मध्ये 2 प्रशिक्षणार्थी ) आहेत. प्रत्येक रुम मध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह, गिझर, कॉट, टेबल, खुर्ची इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. भोजनालय इमारती मध्ये एका वेळी 200 प्रशिक्षणाथींच्या भोजनाची व्यवस्था असून भोजन तयार करण्यासाठी सौर उर्जेव्दारे गरम पाण्याच्या सुविधेसह नविन तंत्रज्ञानाची साधनसामुग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी वसतीगृह व भोजनालयाची पाहणी केली. तसेच यावेळी या प्रकल्पाशी संबंधितांचा सत्कार यावेळी करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आला. यामध्ये पोलीस उपायुक्त (गुन्हे) पुणे शहर श्रीनिवास घाडगे, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व विकास महामंडळ मुंबईच्या अधीक्षक अभियंता अनिता परदेशी, वास्तुविशारद सुप्रिया पाध्ये, अभिजित बनकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

Share This News

Related Post

chagan Bujbal

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Posted by - December 22, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण…

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली आयोध्यातील निर्माणाधीन राम मंदिराची पाहणी

Posted by - April 9, 2023 0
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयोध्या दौऱ्यावर असून या आयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येत निर्माण होत…
indurikar-maharaj

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; ‘ते’ विधान भोवले, कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

Posted by - June 16, 2023 0
औरंगाबाद : सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या कीर्तनातून लिंगभेदावर केलेले भाष्य…
Yavatmal News

Yavatmal News : गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना; 20 वर्षीय गणेशभक्ताचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 29, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) गणपती विसर्जनादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. काल सगळीकडे अंनत चतुर्दर्शी निमित्त गणेशभक्त जड अंतःकरणाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *