सिंधुदुर्ग हादरला! पती-पत्नीत वाद होत असल्याने सासरच्यांनी जावयाला शॉक देऊन मारले

163 0

सासरच्यांनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (वय ३२) असे मृत जावयाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसंत उर्फ सागर याचा नूतन गावडे हिच्याशी विवाह झाला होता. वसंत हा कुडाळ तालुक्यातील माणगाव तळेवाडी येथील रहिवासी होता. पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असायचे. याच वादातून वसंत याची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या घरच्यांनी केला आहे. वसंत याला पत्नी नूतन हिने सोमवारी रात्री आडेली सातेरी गाळू येथे राहत्या घराजवळ बोलावले. वसंत घरी पोहोचायच्या आधीच सासरच्या मंडळींनी त्यांच्या घराच्या कंपाऊंड भोवती विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले. याच तारांचा शॉक वसंतला लागला. व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी त्याचा मृतदेह त्याच परिसरातील एका नर्सरीत आढळून आल्याची धक्कदायक बाब उघड झाली.

याप्रकरणी मयत वसंत याच्या भावाने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मयत वसंत याची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेंगुर्ला पोलिसांकडून सुरू आहे.

Share This News

Related Post

Palghar Crime

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

Posted by - May 8, 2024 0
पालघर : पालघरमधून (Palghar Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दारूच्या नशेत तीन महिलांनी पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत…
Accident News

Accident News : लोणावळ्यात चिक्कीच्या दुकानात ट्रक शिरला

Posted by - October 21, 2023 0
लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर असलेल्या दोन चिक्की विक्री दुकानात ट्रक शिरल्यामुळे मोठा अपघात (Accident News) झाला आहे.…
Nashik News

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 8, 2024 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून अपघाताची (Nashik News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये बाईक आणि स्विफ्ट कारमध्ये धडक झाल्याने…

आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी 3 हजार 800 पानांच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल

Posted by - February 25, 2022 0
पुणे – आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं तब्बल 3 हजार 800 पानांचे दोषारोप…
Beed Accident

Beed Accident : रुग्णाला घेऊ जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - October 26, 2023 0
बीड : बीडमधून (Beed Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *