धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक

341 0

इंदूर- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिला अटक करण्यात आली आहे. इंदूरमधून तिला ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “मी रेणू शर्मा या महिलेला ओळखताे. आपण तिला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये दिले. तसेच एक मोबाईल फाेनही कुरिअरच्या माध्यमातून पाठवला हाेता”. रेणू शर्मा हिने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसांतच तिने ही तक्रार मागे घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाॅट्सएप तसेच फोन करून मुंडेंकडून पैशांची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांना दिले आहेत.

हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांमध्ये इंदौरला जाऊन रेणू शर्मा हिला ताब्यात घेतले. रेणू शर्मा हिला मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर केले. यावेळी झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने रेणू शर्मा हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांना काय दिली होती धमकी ?

”पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्रीपद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?”,असा मॅसेज तिने मुंडेंना पाठविला होता. त्याचबरोबर 5 कोटी रुपये कॅश आणि 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

कोण आहे रेणू शर्मा ?

रेणू शर्मा मध्य प्रदेशची असून सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांची बहीण आहे. रेणू शर्मा ही गायिका असल्याचे बोलले जात असून देशी लव्ह, फुलों की तरह खिलते रेहेना, मी आहे तुझ्या व्हाट्सअप वर ही गाणी रेणू शर्मा हिने गायली आहेत. तिला टिफाचा बेस्ट प्ले बॅक सिंगर पुरस्कार मिळालेला आहे

Share This News

Related Post

पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Posted by - April 28, 2022 0
पुणे-सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा चौकात दोन कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर तिघांना लोणी काळभोरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

राहुल गांधी यांच्या वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार का ? काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त ?

Posted by - March 29, 2023 0
सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने कारवाई करत…
Rain Update

Rain Update : पावसाने घेतली क्षणभर विश्रांती; मात्र ‘या’ दिवसापासून राज्यात पुन्हा होणार मुसळधार पाऊस

Posted by - August 1, 2023 0
पुणे : थैमान घालणाऱ्या पावसानं (Rain Update) आता काहीशी विश्रांती घेतल्यामुळं अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. जुलै महिन्यात या पावसाने…
shinde and uddhav

उद्या सत्ता संघर्षाचा निकाल लागणार; सरकार राहणार कि जाणार?

Posted by - May 10, 2023 0
पुणे : शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात अजून प्रलंबित आहे. तो उद्या लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली…

उपेक्षित समाज घटकांच्या विकासात विनायक मेटे यांचं मोठं योगदान – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचं  अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *