जावयाने केले सासऱ्यावर चाकूने सपासप वार, खुनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद

752 0

पुणे- पती-पत्नीच्या वादातून जावयाने सासऱ्यावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

अशोक कुडले असे खून करणाऱ्या जावयाचे नाव असून रमेश रामचंद्र उत्तरकर (वय ६५) असे मृत्युमुखी पडलेल्या सासऱ्याचे नाव आहे. खुनानंतर जावयाने हातात चाकू घेऊन थेट पोलीस ठाणे गाठून खुनाची कबुली दिली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक कुडले याचा रमेश उत्तरकर यांच्या मुलीसोबत विवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून अशोक कुडले आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू होता. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यांच्यातील वाद न्यायप्रविष्ठ आहे. वाद झाल्याने पत्नी नांदायला येत नव्हती. याचाच राग अशोक कुडले याच्या मनात होता.

उत्तरकर त्यांच्या कपड्याच्या दुकानात बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बसले होते. या ठिकाणी अशोक कुडले आला. काहीवेळ या दोघांमध्ये वाद झाला. माझ्या पत्नीला सासरी पाठवा असे कुडले सांगत होता. उत्तरकर यांनी त्याला नकार देताच अशोक याने हातातील चाकूने उत्तरकर यांच्यावर सपासप वार केले. या घटनेत उत्तरकर मृत्युमुखी पडले.

Share This News

Related Post

Nagpur Accident

Nagpur Accident : समृद्धी महामार्गावर डॉक्टर मायलेकाच्या गाडीचा भीषण अपघात; आईचा दुर्दैवी अंत, तर मुलाची तब्येत चिंताजनक

Posted by - August 26, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur Accident) एक धक्कादायक घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावरून जात असताना डॉक्टर मायलेकाच्या गाडीचा भीषण अपघात झाला.…

धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

Posted by - March 5, 2022 0
शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक…

‘अतिक आणि त्याच्या गुंडांनाही असंच मरण येईल….’ ‘या’ महिलेची शापवाणी खरी ठरली

Posted by - April 17, 2023 0
अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असंच मरण येईल, जसं माझ्या पतीला आलं. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचं…

4 व 5 जून रोजी पुण्यात रंगणार स्व. ज्योत्स्ना भोळे स्मृती स्वरोत्सव

Posted by - June 1, 2022 0
पुणे – शास्त्रीय, सुगम तसेच नाट्यसंगीतातील प्रतिथयश गायक आणि प्रतिभावान युवा कलाकारांना ऐकण्याची संधी यंदाच्या ‘स्वरोत्सव’ या मैफलीत मिळणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *