हरिभाऊ बागडेंनंतर कोण होणार फुलंब्रीचा आमदार? भाजपामध्ये तब्बल ‘इतके’जण इच्छुक

1630 0

महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांचे राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागले आहे. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाल्यामुळे फुलंब्रीचा पुढचा आमदार कोण असणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट…

सक्रिय राजकारणातून निवृत्तीची हरिभाऊ बागडे यांनी घोषणा केल्यानंतर त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागली आहे… हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्याने फुलंब्रीच्या विधानसभेच्या आखाड्यात कोण उतरणार या चर्चांना उधाण आलं असून भाजपामध्ये अनेक इच्छुक चेहरे पाहायला मिळत आहेत. फुलंब्री विधानसभेसाठी भाजपाकडून कोण इच्छुक आहे पाहूया

अनुराधा चव्हाण: भाजपाकडून फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांच्या यादीत सर्वात प्रबळ दावेदार म्हणून अनुराधा चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे. अनुराधा चव्हाण या भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य असून छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालविकास सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे 

डॉ. राधाकिशन पठाडे: फुलंब्री विधानसभेसाठी भाजपकडून डॉ. राधाकिशन पठाडे देखील इच्छुक असून राधाकिशन पठाडे हे छत्रपती संभाजी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असून भाजपाचे छत्रपती संभाजी नगर तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. 

या नावाने खेरीज भाजपामधून सुहास शिरसाट, विजय औताडे, रामभाऊ शेळके दामूअण्णा नवपुते, राजेंद्र साबळे आधी इच्छुक आहेत

Share This News

Related Post

भूमिहीनांच्या डोक्यावर टांगती तलवार आणि गायरानात मंत्र्यांची चराई! दुर्बल अतिक्रमातांना मात्र नोटिसा हा निर्लज्जपणाच – आप

Posted by - December 27, 2022 0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या आधारे आणि २०२२मधील हायकोर्टाच्या आदेशानुसार मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने गायरानांवरील सर्व अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या होत्या. स्थानिक लोकांच्या विरोधानंतर…

अर्रर्र ! पत्नीने ताटात वाढलेली न आवडती भाजी पाहून शीघ्रकोपी पतीने स्वतःचेच घर दिले पेटवून; 10 लाखाचे नुकसान

Posted by - March 1, 2023 0
उज्जैन : उज्जैनमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. एका शीघ्रकोपी पतीने कामावरून आल्यानंतर पत्नीने न आवडती भाजी ताटात वाढली…

अहमदनगरमध्येही राज ठाकरेंचे जंगी स्वागत! राज ठाकरे यांनी घेतले शाकाहारी जेवण

Posted by - April 30, 2022 0
अहमदनगर- औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना झाले. राज ठाकरे यांचे अहमदनगरमध्येही जोरदार स्वागत करण्यात आले. वाटेत पुण्याहून…
Maharashtra Politics

Maharashtra Politics : मविआमध्ये विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा

Posted by - May 31, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात (Maharashtra Politics) आली आहे. लोकसभेच्या सहा टप्प्यांसाठी मतदान झालं आहे. तर सातव्या…

पुनीत बालन ग्रुप’मार्फत आषाढी वारीतील ८ हजार पोलिसांना आवश्यक वस्तूंचे किट

Posted by - June 19, 2024 0
  पुणे : प्रतिनिधी आषाढी वारीसाठी पंढरपुरमध्ये येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची आठ हजार किट पुनीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *