हवामान बदलामुळे पुणेकर पडले आजारी! पुण्यात झिकासह डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढले

858 0

पुणे शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे अर्थातच अस्वच्छता वाढली आहे. त्याचा थेट परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत आहे. पुणे शहरात झिकाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत तर दुसरीकडे व्हायरल फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार देखील पसरत आहेत.

पुण्यात झिकाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आज पुण्यातील रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली असून यामध्ये सर्वाधिक रुग्ण या गर्भवती महिला आहेत. झिका पाठोपाठ शहरात डेंग्यूची साथ पसरत असल्याचे दिसून येत आहे. केवळ जुलै महिन्यात पुण्यात डेंग्यूचे एकूण 216 संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. तर या एका आठवड्यामध्ये 150 पेक्षा जास्त संशयित रुग्णांची संख्या आहे. तर चिकुनगुनियाचे १५ रुग्ण आढळून आले आहेत.

 

या आजारांचे मूळ कारण ठरत असलेल्या डासांची उत्पत्ती थांबवणे, हे महानगरपालिके समोरचे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने कीटकनाशके फवारणी सारख्या उपयोजना सुरू केल्या आहेत. मात्र या आजारांच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची आणि वृद्धांची विशेष काळजी घ्यावी. डास असलेल्या भागात जाणे टाळावे, डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी स्वच्छता ठेवावी, असे आवाहन देखील आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

गर्भवती मातांच्या चाचण्या सुरू

पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दहा गर्भवती मातांचा समावेश आहे. झिका व्हायरसचा मातेच्या गर्भातील बाळाला धोका असतो. त्यामुळे आरोग्य विभागाने गर्भवती मातांच्या चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मातांनी वेळोवेळी तपासण्या आणि सोनोग्राफी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी केले आहे.

Share This News

Related Post

ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता व देखभालीसाठी उद्योजक पुनीत बालन यांचा पुढाकार

Posted by - August 18, 2024 0
पुणे:समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले युवा उद्योजक पुनीत बालन यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता आणि देखभाल करण्याची जबाबदारी घेतली आहे. इंद्राणी…
Pune Video

Pune Video : रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या रुग्णवाहिकेनेच घेतला वृद्ध व्यक्तीचा जीव

Posted by - July 10, 2023 0
पुणे : रुग्णवाहिका हि रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी असते. मात्र पुण्यामध्ये (Pune Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चक्क एका…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 12, 2024 0
पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra…
Sushma Andhare And Rupali Chakankar

Sushma Andhare : सुळेंनी माहेरी लूडबूड करू नये म्हणणाऱ्या चाकणकरांना अंधारेंनी दिले सडेतोड उत्तर; म्हणाल्या…

Posted by - March 21, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता…

शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते होणार सुरक्षित ! पुणे महापालिका शहरातील रस्त्यांवर साकारणार ‘सेफ स्कूल झोन’

Posted by - January 17, 2023 0
पुणे : शालेय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सुरक्षितरित्या चालत अथवा सायकलवर जाता यावं यासाठी पुणे महापालिकेन ‘स्कूल सेफ झोन’ या प्रकल्पाच नियोजन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *